back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

अकोल्यात सायकल दुकानातून 1.15 कोटींची रोकड जप्त; आयुध निर्माणी स्फोटप्रकरणी आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा

Akola News : अकोल्यात एका सायकलच्या दुकानातून तब्बल 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीचे दुकानात खदान पोलिसांनी ही कारवाई केलीय. यावेळी त्यांनी 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केलीय. संबंधिताला या रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी नागपूर येथील आयकर विभागाला याबाबत माहिती दिलीये. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ही कारवाई करण्यात आलीय. दीपक घुगे नामक व्यक्तीजवळ पांढर्‍या रंगाच्या दोन कापडी पिशव्या होत्या. त्यामध्ये 500 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल होतेय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करतायेत.

आयुध निर्माणीच्या आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या LTPE सेक्शनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. नव्यानं गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे (५९) यांच्यासह महाप्रबंधक अनुज प्रसाद (५९), महाप्रबंधक ललित कुमार (४९) यांचा समावेश आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर दाखल आहेत गुन्हे. या तिघांच्या समावेशाने आता आयुध निर्मणी स्फोट प्रकरणात हलगर्जीपणा केल्यानं आतापर्यंत सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणात चौकशीअंती आयुध निर्माणीचे एकूण सात अधिकारी दोषी आढळून आले असून पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या लेखी रिपोर्टवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी करीत आहेत.

यापूर्वी यांच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा

१) देवेंद्र रामदास मिना (४९) (सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी)
२) आदिल रशील फारुकी (४६) (ज्युनीअर वर्क मॅनेजर, मेन्टनन्स विभाग)
३) संजय सुरेश धपाडे (४४) (सामान्य प्रशासन विभाग)
४) आनंदराव मधुकरराव फाये (५०) (सेक्शन प्रभारी अधिकारी) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Popular Categories

spot_imgspot_img