शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिंधे यांच्यावर केलेले गाणे योग्
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मिंधेंनी मुख्यमंत्र्यांना दुबळे केले – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणे सादर केले, त्या कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने फोडला. कुणाल कामराचे गाणे 100 टक्के खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित घाबरट व्यक्तीच अशी प्रतिक्रिया देईल. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना कमकुवत करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.
…तर माझ्यावर दररोज गुन्हे दाखल होतील – संजय राऊत
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी कुणाल कामराला खूप दिवसांपासून ओळखतो… तो आमच्यावर अशाच प्रकारे टिप्पणी करायचा. माझा असा विश्वास आहे की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर वैयक्तिक टिप्पणी नसेल तर ती स्वीकारली पाहिजे. जर टिप्पणी कोणत्याही राजकीय विचारसरणीवर असेल तर ती स्वीकारली पाहिजे. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. कुणाल कामरा यांचे कार्यालय, स्टुडिओची तोडफोड करण्यात आली… ही गुंडगिरी आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी रोजच टीकात्मक लिहित असतो. ते माझे काम आहे. या न्यायाने माझ्यावर दररोजच गुन्हे दाखल होतील. विधानसभेतील सदस्यांचे कामकाज पाहिले तर त्यांच्यावर देखील रोज गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण वाचले, तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. कमजोर लोकांवर का गुन्हे दाखल करता? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.
स्वातंत्र्याचा स्वैराचार मान्य नाही – फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराकडून स्वातंत्र्याचा स्वैराचार केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. स्टँडअप कॉमेडी करण्याचा सर्वांना अधिकार. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या निवडणुकीत कोण गद्दार व कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले आहे. कुणाकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाला मिळाला आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुम्ही जरूर व्यंग व कॉमेडी करा. पण कुणालाही कुणाचा अपमान करण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले.