मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार कदापी मान्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. कुणाल कामरा
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त भूमिका विषद केली आहे.
कोण गद्दार व कोण खुद्दार हे जनतेने स्पष्ट केले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कुणालाही आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. खरे म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार व कोण खुद्दार आहे? हे दाखवून दिलेले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोणाकडे गेल? हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या पातळीवरची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
कुणाल कामराने माफी मागावी
तुम्ही कॉमेडी अवश्य करा, पण त्याद्वारे कुणी अपमानित करण्याचे काम करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. हे अतिशय चुकीचे आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे.
कुणाल कामरा जे संविधानाचे पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान त्यांनी वाचले असेल तर संविधानानेच सांगितलेले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
एकनाथ मिंधेंनी फडणवीसांना दुबळे केले:आदित्य ठाकरे यांचा आरोप; कुणाल कामराचे गाणे योग्यच असल्याचे नमूद करत केली पाठराखण
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिंधे यांच्यावर केलेले गाणे योग्यच आहे. आता मिंधे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कमकूवत केले आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर