back to top
Wednesday, June 18, 2025
25.8 C
London

चंद्रपूरमध्ये ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा भांडाफोड – ३ बुकी अटकेत, ६० लाखांची रक्कम गोठवली

चंद्रपूर : भारताने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) जिंकल्यानंतर भारताने दुबईत तिरंगा फडकवला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. याच सामान्यादरम्यान सट्टा बाजरात ही चांगलीच उसंत असल्याचे पुढे आले आहे. अशाच एका ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा भांडाफोड करत चंद्रपूर (Chandrapur Crime News) गुन्हे शाखेने तीन कुख्यात बुकींना अटक केली आहे.

विशेष म्हणजे या आरोपींनी (Crime News) ऑनलाइन क्रिकेट बेटिंगसाठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा केला वापर, आयडी-पासवर्ड देऊन लोकांकडून या खात्यांमार्फत केले जात होते आर्थिक व्यवहार, स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व अकाउंट सिझ केले असून या खात्यांमधली 60 लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे.

ऑनलाइन क्रिकेट बेटिंगसाठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा वापर

पुढे आलेल्या माहितीनुसार, पारस उखाडे, अविनाश हांडे आणि राकेश कोंडावार अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावं आहेत. शिवाय याआधी देखील यांच्यावर क्रिकेटवर सट्टा आणि बॅटिंग केल्याचा गुन्हा दाखल असल्याची ही माहिती आहे.  क्रिकेटवर बेटिंग करण्यासोबतच ऑनलाइन सट्टा खेळण्यासाठी इतर लोकांना हे तिघं आयडी-पासवर्ड देऊन पैसे घेत होते. आरोपींकडून पाच मोबाईल आणि 27 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे विशेष म्हणजे या आरोपींनी ऑनलाइन क्रिकेट बेटिंग साठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा केला वापर, आयडी-पासवर्ड देऊन लोकांकडून या खात्यांमार्फत केले जात असल्याचे ही पुढे आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सध्या करत आहेत. मात्र या कारवाईमुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्याचा खून, ‘तो’ बार अँण्ड रेस्टॉरेंट सिल

चंद्रपुरच्या ज्या बारमधील भांडणात पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला तो पिंक पैराडाईज बार अँण्ड रेस्टॉरेंट आता सील करण्यात आला आहे. सिटी पोलीस स्टेशने ही कारवाई केली आहे. शुक्रवारी पिंक पैरेडाईज बारसमोर युवकांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.

बार समोर बांधकाम साहित्य, रेती, गिट्टी, बल्ली, फाटे ठेवल्यामुळे बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाहने ठेवण्यास पार्कंग व्यवस्था नसल्याने आणि  वाहने रोडवर उभ्या असल्याने सार्वजनीक वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन सर्वसाधारण नागरीकांना अडथळा व गैरसोय होत होती.  तसेच या बार मध्ये वारंवार झगडा-भांडण होऊन त्याचे रूपांतर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात घडल्याने कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी परिसरातील नागरीकांच्या मागणीवरून हा बार सीलबंद करण्यात आलाय.

Popular Categories

spot_imgspot_img