Nagpur: नागपूर शहराच्या महाल परिसरात मार्च 17 रोजी दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनिअरला नागपूर सत्र न्यायालयाने जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनावर मुक्त करण्याचे हे आदेश देण्यात आले असून उद्या (22 एप्रिल) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात सोशल मीडियावर दंगल भडकवणारे व्हिडिओ टाकण्यामागे हमीद इंजिनिअरचा कट असल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी हमीद इंजिनिअरला अटक करण्यात आली होती. (Nagpur Riots)
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या फहिम खानच्या जामिनावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार असून सध्या फहीम खान न्यायालयीन कोठडीत आहे.
कोण आहे हमीद इंजिनिअर?
हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मिडिया मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो. सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. हमीद इंजिनिअरने फहीम खानच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्या दिवशी हिंसाचार झाला त्या दिवशी हमीद लोकांमध्ये भीती निर्माण करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप आहे. ती विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाली.

एवढेच नाही तर या विधानांचा हवाला देऊन लोकांकडून देणग्याही मागितल्या गेल्या. आता नागपूर सत्र न्यायालयाने हमीद इंजिनिअरला जामीनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. हमीद इंजिनिअरची औरंगजेब समर्थक म्हणून ओळख आहे. नागपुरात ज्या दिवशी हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर वास्तव्यास होता असे समोर आल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली होती. 17 मार्चला महाल आणि हंसापुरी येथे मोठा हिंसाचार घडला.यादरम्यान समाजकंटकानी पोलिसांवर हल्ले, जाळपोळ आणि दगडफेक केली. यात अनेक नागरिक तसेच पोलिस कर्मचारी जखमी झाले. या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खान याला आधीच पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे.