सुधीर मुंगतीवार: ‘लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप करण्यात आला त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती देण्यात आली,’ असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केलाय.
सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

2014 ते 2019 आणि 2022 ते 2024 पर्यंत सुधीर मुनगंटीवार हे मंत्री होते. मात्र, 2024 निवडणुकीनंतर त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे.
‘मंत्रिपद का नाकारलं याबाबत मला अशी माहिती देण्यात आली की, लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे. स्वत:हून कोण पराभूत होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, मला लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीर पणे सांगितले पण पराभूत व्हायचं हे कस होईल,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
‘लोकसभेत एकटाच पराभूत झालो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार पराभूत झालेत. तेव्हा वातावरणच तसं होतं. संविधानाच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात जे नरेटिव्ह सेट केले त्यामुळं आम्ही पराभूत झालो. उमेदवार म्हणून लढायचं नव्हतं पण उमेदवार झाल्यानंतर तर मी इतक्या कडक उन्हात फिरलो. पण मी पूर्वतयारी करु शकलो नाही. दिवस कमी होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट
‘मंत्रिपद ज्याने कोणी काढलं असेल किंवा मला मंत्रिपद देऊ नये असं सांगितलं असेल. तर त्यावर उत्तर काय. उत्तम काम करणे. मी माझ्या जिल्ह्यात मिशन ‘ऑलिंपिक 36′ वर काम करतो. माझा उद्देश काय तर ऑलिंपिकमध्ये माझ्या जिल्ह्याचा कोणीतरी मेडल प्राप्त करेल. मी आता या ठिकाणी माझ्या जिल्ह्याच उत्तम उत्तम काम करेन. पंतप्रधानांच्या हस्ते माझ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकारमध्ये 10 विषयांत नंबर एक आहोत. अजूनही खूप काम करायचंय,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
मंत्रिपद गेल्याची खंत आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, ‘मी जेव्हा माझ्या नातींना मांडीवर घेतो तेव्हा सर्वात जास्त आनंद असतो. मंत्रीपद जाणे येणे हे होतंच आणि कोण पर्मनंट आहे. मंत्रीपद गेल्याची अजिबात खंत नाही,’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.