वक्फ सुधारणा विधेयक दोन दिवसांपूर्वी लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या चर्चेदरम्यान बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ल चढवला होता. आम्ही इतकी वर्षे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन आलो. पण ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या विचारांच्या विर
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी रंगावरून जात धर्म कळतो का? असा सवालही केला. काही लोक बालिशपणे बोलतात. मला फालतू चर्चांवर बोलण्यात अर्थ नाही. त्यांना जास्त महत्व नाही. त्यांना आम्ही महत्व देत नव्हतो, म्हणून ते कॉफी आणून द्यायचे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या टीकेवर पलटवार केला. आता आदित्य ठाकरेंच्या टीकेवर श्रीकांत शिंदे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहावे लागणार आहे.
आज मुस्लीम, नंतर इतर समाजालाही टार्गेट करतील

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आता मुस्लीम समाजाला टार्गेट केले. काही दिवसांनी जैन समाज आणि इतर समाजाला देखील टार्गेट केले जाईल. जमिनी बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख एसंशि असा केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. मला एसंशि म्हणाले, मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, युज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचे. हात पाय मारण्याचा प्रयत्न एसंशी करत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
हॉस्पिटलवर कारवाई कोण करतंय याकडे आमचे लक्ष
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हॉस्पिटलवर काय कारवाई करणार? याकडे आमचे लक्ष आहे. राजकारणात न जाता कारवाई कोण करतय याकडे आमचे लक्ष आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून पाच वेळा फोन गेले. पण त्यांनी ऐकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?
आम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन गेलो, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेलो. बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन यांनी मतदान केलं. मी देखील शॉक झालो, सभागृह देखील शॉक झाले की उबाठा गटाचे खासदार असे कसे बोलू शकतात? मला वाटतंय ते समाजवादी पार्टीचे कोणी खासदार बोलताय की का? असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.