back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

विदर्भात उष्णतेचा कहर: पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Nagpur: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील तापमान (Temperature) सातत्याने नवे उच्चांक गाठत आहे. या वाढत्या उन्हाचा फटका नागरिकांना बसत असून  वैदर्भीय पुरते हैराण झाले आहेत. सध्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 44 अंश सेल्सिअसच्या वर गेला असून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने (IMD) वर्तवली आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.   

दरम्यान, 31 मार्चला भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अहवालात याचे भाकीत वर्तवले होते की, या वर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील व मध्य भारतात याचा अधिक प्रभाव राहणार आहे. त्यात विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंश सेल्सिअसपर्यंत पेक्षा जास्त तापमान पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात देखील राज्यभर सरासरीच्या अधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती नागपूर वेध शाळेच्या संचालकांनी दिली आहे. अशातच उद्या (9 एप्रिल) आणि परवा(10 एप्रिल) विदर्भातील अकोला, बुलढाणा , अमरावती यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

….म्हणून राज्यातील तापमान झपाट्याने वाढतंय 

नागपूर प्रदेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, काल (7 एप्रिल) राज्यात अकोल्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुजरात व राज्यस्थान मार्गे उष्ण वारे हे उष्ण व कोरडे असल्याने राज्यातील तापमान झपाट्याने वाढत असल्याचे नागपूर वेध शाळेचे महासंचालक बी सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.

 नागरिकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाकडून  ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

सध्या नागपूरचा पारा 42 अंश सेल्सिअस वर गेला आहे. पुढील काळात तो 45 अंश सेल्सियाच्या वर जाण्याची शक्यता आहे. यावर्षी उन्हाळा हा अधिक उष्ण  राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागपूर महानगर पालिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हिट ऍक्शन प्लॅन तयार केल्याचे नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी एबीपी माझाला सांगितले आहे.

– हिट ऍक्शन प्लॅन नुसार बेघरनागरिकांसाठी  साठी शेल्टर हाऊस उभारण्यात आले. तसेच दुपारच्या वेळेला नागरिकांना गरज भासल्यास विश्रांती वेळ आली तर त्यासाठी  शहरातील सर्व गार्डन हे दुपारला उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले.

– नागपूर शहरातील 10 शासकीय रुग्णालय विशेष वॉर्ड उभारण्यात आले असून उष्मघात रुग्णांसाठी यात वॉर्डात  विशेष औषधपचार सुविधा असणार आहे.

– शहरातील कॉटन मार्केट, गणेशपेठ , मोमीनपुरा, इतवारी , कळमना, भांडेवाडी, उत्तर नागपूर यासारख्या हॉटस्पॉट भागात पालिकेचे पथक विशेष लक्ष ठेवणार असून या भागात जनजागृती मोहीम च्या माध्यमातून नागरिकांना उन्हापासून बचाव कसा करायचा याची माहिती दिली जाणार आहे.

-तसेच पालिका हद्दीतील शाळेच्या वेळात बदल करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौरस्त्याचे वाहतूक दिवे दुपारच्या वेळेला बंद करण्याच्या सूचना केल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

Popular Categories

spot_imgspot_img