back to top
Monday, July 14, 2025
17.3 C
London

शिवाजी महाराजांविषयी संभाजी भिडे यांचे वक्तव्य; अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया

 

‘शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे’, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होतं. पुढे त्यांनी असेही म्हटले होते की, शिवाजी महाराजांसारख्या अलौकिक व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग करत आहेत. त्यांचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले प्राध्यापक, व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री आहेत. स्वतः शहाजीराजे यांनीही हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचे राष्ट्र करायचे आहे. तर शिवाजी महाराजांचा उपयोग हे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल, हे बघतोय त्यामुळे सगळा चौथा झाला असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत त्यांना खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात, धर्म पाहिला नाही.’, असं अजित पवार म्हणाले.

Popular Categories

spot_imgspot_img