शिवसेना ठाकरे गटाचा एका कार्यकर्ता स्मशानात तिरडीवर जाऊन झोपला. या शिवसैनिकासोबत अन्य इतरही कार्यकर्ते होते. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हे अनोखं, प्रतिकात्मक विरोध प्रदर्शन करण्यात आलं. या आंदोलनाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात अशा प्रकारच आंदोलन करण्यात आलं. बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण गावातील ठाकरे गटाचा कार्यकर्ता कारभारी म्हसळेकरने स्मशानात तिरडीवर झोपून राज्य सरकार विरोधात प्रदर्शन केलं. त्याचं हे अनोख आंदोलन चर्चेचा विषय बनलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणासाठी कारभारी म्हसळेकरने हे आंदोलन केलं.
जो पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळत नाही, तो पर्यंत माझ जीवनही स्मशानासारखं आहे, म्हणून यावेळी आंदोलनासाठी मी स्मशान आणि तिरडीची निवड केली असं कारभारी म्हसळेकरांनी सांगितलं. कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत हा प्रतिकात्मक संदेश देण्याचा माझा प्रयत्न होता असं ते म्हणाले.
पण सरकारची प्राथमिकता दुसरीच

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं. असं म्हसळेकरांनी आरोप केला. पण निवडणूक जिंकल्यानंतर सरकारला आश्वासनाचा विसर पडला. आजही महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बँक आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. पण सरकारची प्राथमिकता दुसरीच आहे असं म्हसळेकरने आरोप केला.
झाडावर चढून प्रदर्शन
कारभारी म्हसळेकरने अशा प्रकारच प्रतिकात्मक, अनोख आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 7 फेब्रुवारी 2025 रोजी झाडावर चढून प्रदर्शन केलं होतं. शेतकऱ्यांची स्थिती, सरकार आणि समाजाच लक्ष वेधणं हा या आंदोलनांमागे उद्देश होता. सरकार जो पर्यंत कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर करत नाही, तो पर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन सुरु राहिलं असं कारभारी म्हसळेकरने सांगितलं.