back to top
Sunday, September 14, 2025
10 C
London

निधी तिवारी ‘अशा’ बनल्या PM मोदींच्या पर्सनल सेक्रेटरी; काय जबाबदारी? किती पगार? जाणून घ्या!

पंतप्रधान मोदी खासगी सचिव: पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पीएमओमध्ये एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती विषयक मंत्रिमंडळ समितीने या नियुक्तीला मान्यता दिली. यापूर्वी निधी तिवारी पीएमओमध्ये उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांना परराष्ट्र मंत्रालयात (MEA) काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. या नवीन जबाबदारीसह, त्या पंतप्रधानांना त्यांच्या प्रशासकीय कामात मदत करतील आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. निधी यांच्याकडे नेमकी काय जबाबदारी असणार? त्यांना किती पगार मिळेल? सविस्तर जाणून घेऊया.

कोण आहेत निधी तिवारी ?

निधी तिवारी या2014 च्या बॅचच्या आएफएस अधिकारी असून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात परराष्ट्र मंत्रालय (MEA) पासून केली. त्यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात अवर सचिव म्हणून काम केले. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यांची कार्यक्षमता आणि प्रशासकीय कौशल्ये लक्षात घेता त्यांना आता पंतप्रधान मोदींचे वैयक्तिक सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलंय. आयएफएस निधी तिवारी यांची नोव्हेंबर 2022 मध्ये पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात (एमईए) निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात अवर सचिव म्हणून काम केले.

डीओपीटीच्या आदेशात काय म्हटलंय?

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, निधी तिवारी यांची नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयात असताना त्यांनी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय कामांमध्ये भूमिका बजावली आहे. या नियुक्तीमुळे निधी आता पंतप्रधान मोदींना दैनंदिन कामे, बैठका आणि सरकारी निर्णयांचे समन्वय साधण्यास मदत करतील.

निधी तिवारींकडे काय असणार जबाबदारी?

सरकार प्रशासकीय पदांसाठी सक्षम आणि अनुभवी अधिकाऱ्यांना प्राधान्य देत आहे.  एक अनुभवी राजनयिक म्हणून निधी यांना राजनयिकता आणि प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती ही प्रशासकीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करता त्या ही भूमिका प्रभावीपणे साकारतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव म्हणून निधी तिवारी आता दैनंदिन प्रशासकीय काम पाहतील. पंतप्रधानांच्या बैठका परदेश दौऱ्यांची तयारी आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या पदावर असताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय साधावा लागेल. महत्त्वाच्या बैठका आयोजित कराव्या लागतील आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागेल.

किती असेल पगार ?

माध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान कार्यालयात खासगी सचिव पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे वेतनमान वेतन मॅट्रिक्स स्तर 14 नुसार निश्चित केले जाते. या स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यास दरमहा 1 लाख 44 हजार 200 रुपये इतका पगार दिला जातो. यासोबतच महागाई भत्ता (DA), घर भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि इतर भत्ते देखील दिले जातात.

Popular Categories

spot_imgspot_img