जीटी वि पीबीक्स आयपीएल 2025प्रतिमा क्रेडिट स्रोत: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज एक्स खाते
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर पंजाब नव्या कर्णधारासह नव्या मोसमाची सुरुवात करणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा या हंगामात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात रस्सीखेच पाहायला मिळणार, हे निश्चित आहे. गुजरात विरुद्ध पंजाब सामना कुठे होणार? याबाबत सर्व काही जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मंगळवारी 25 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
पंजाब किंग्ज टीम: जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.
गुजरात टायटन्स टीम: जोसे बटलर (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्नाधर), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवाटिया, राशिद खान, रवीशान साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रियासी जनूत, करीम जानौत, कुलवंत खज्रोलिया, कुलवंत खज्रोलिया, कुलवंत खज्रोलिया, कुलवंत खज्रोलिया, कुलवंत खज्रोलिया, जेराल्ड कोएत्झी, शेरफेन रदरफोर्ड, मानव सुथर, कुमार कुशाग्रा, अरशद खान, गुरनूर ब्रार आानी निशांत सिंधू.