back to top
Saturday, September 13, 2025
13.8 C
London

पाकिस्तान हादरलं! पाक सैन्यावर सर्वात मोठा हल्ला, BLAच्या हल्ल्यात 90 सैनिक ठार

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. यावेळी बलुच दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्याने हा हल्ला भारतातील पुलवामा हल्ल्यासारखाच असल्याचे दिसत आहे. बलुचिस्तानमधील नोश्की येथे सुरक्षा दलाच्या सात बस आणि दोन गाड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 5 सैनिकांचा मृत्यू झाला असून 13 सैनिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती देताना बीएलएने दावा केला आहे की, या हल्ल्यात सुमारे 90 जवान शहीद झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “एक बसला व्हीकल बॉर्न आयईडीने लक्ष्य केले होते. हा आत्मघातकी हल्ला होता. तर दुसरी बस क्वेटा ते तफ्तानला जात असताना रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने लक्ष्य करण्यात आली होती.” हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना नोश्की आणि एफसी कॅम्पमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती नोश्कीचे एसएचओ सुमलानी यांनी व्यक्त केली.

https://twitter.com/hashtag/BREAKING?src=hash&ref_src=twsrc%5Etfw

बलुच लिबरेशन आर्मीचे विधान

हल्ल्यानंतर, बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले गेले आहे की, बलुच लिबरेशन आर्मी (BLA)च्या आत्मघाती युनिट मजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोश्की येथील आरसीडी महामार्गावरील राखशान मिलजवळ व्हीबीआयईडी आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर लक्ष्य केले. ताफ्यात आठ बस होत्या, त्यापैकी एक स्फोटात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हल्ल्यानंतर लगेचच, बीएलएचे फतेह पथक पुढे सरकले आणि दुसऱ्या बसला पूर्णपणे वेढा घातला. त्या बसमधून प्रवास करणाऱ्या जवानांना ठार मारले. त्यामुळे मृतांची संख्या ९०वर पोहोचली आहे.

Popular Categories

spot_imgspot_img