back to top
Saturday, September 13, 2025
11.7 C
London

यवतमाळ: रक्तचंदनाच्या झाडासाठी शिंदे परिवाराची न्यायालयीन लढाई: ५ कोटींच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत

यवतमाळ: यवतमाळच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केले. ही बाब कोणालाही पचनी पडणार नाही. मात्र, हे सत्य आहे. पुसद तालुक्यातील खुर्शी येथील पंजाब केशव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पंजाब केशव शिंदे हे रक्तचंदनाच्या एका झाडामुळे करोडपती झाले.

नेमकं प्रकरण काय?

पंजाब केशव शिंदे यांच्या 7 एकरमध्ये वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतीही नव्हते. 2013-14 मध्ये वर्धा- नांदेड रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले. मात्र, या झाडाचे मूल्य देण्याचे टाळाटाळ करत होते. त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन 4 कोटी 97 लाख रुपये निघाले. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. शिंदे परिवार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हे प्रकरण दाखल केले. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. दरम्यान, रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही. मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते, असं याचिकाकर्त्याच्या वकीलांनी सांगितले. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली.

रक्त चंदन हे एक आयुर्वेदिक औषधी झाड-

रक्त चंदन हे एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. याला लाल चंदन असेही म्हणतात. शास्त्रीय भाषेत याचे नाव टेरोकार्पस सॅन्टलिनस आहे. हे झाड भारतात उगवते. रक्त चंदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते. चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चांदनाप्रमाणे रक्त चांदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते, त्वचेवरील कठीण आणि दीर्घकालीन पिग्मेंटेशन स्पॉट्स, चट्टे आणि मुरुमे काढून टाकतो आणि हलके करतो.

संबंधित बातमी:

50 झाडे लावा, करोडपती व्हा, कमी काळात शेतकऱ्यांना मालामाल होण्याचा सोपा मार्ग 

अधिक पाहा..

Popular Categories

spot_imgspot_img