back to top
Wednesday, July 30, 2025
19.6 C
London

राजकारणात माझे दोन गॉडफादर…’, बाळासाहेब आणि शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

छगन भुजबाल: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. छनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी नाराजी स्पष्ट केली होती. मात्र पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. झी २४ तासच्या टु द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ होऊन ८ महिन्यानंतर स्थान मिळालं याप्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. थांबावं लागतं, वाट पाहावी लागते. आपल्याच मनाप्रमाणे गोष्टी होतात असं नाही. थांबाव लागतंच. राजकारणत चालतंच. राजकारणातील सत्तापदे ही अळवावरची पाणी आहेत. ती कधी निसटून जातील ते काही सांगता येत नाही. त्यामुळं तयारीतच राहावं लागतं. आयुष्याचं सुद्धा असंच आहे तर तर या पदाचं काय घेऊन बसलात, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

राजकारणात माझे दोन गॉडफादर…

मी राजकारणात आलो तेव्हा काही माझे कोणी गॉडफादर नव्हते. माझे पहिले गॉडफादर बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे गॉडफादर शरद पवार. मी जेव्हा चांगलं काम केले. जीव तोडून काम केले तेव्हा बाळासाहेबांनी मला जवळ केले. कधीही चांगलं द्यायचे असेल तेव्हा बाळासाहेबांनी माझा विचार पहिले केला. मी पहिला आमदार झालो शिवसेनेतून. शिवसेनेचे सगळे उमेदवार पडले. एकटा छगन भुजबळ निवडून आला. नंतर महापालिकेते निवडणूक आली तेव्हा बाळासाहेबांनी भुजबळ तुम्ही उभे राहियचे सांगितले. मी उभा राहिलो आणि शिवसेनेने मुसंडी मारली आणि मी महापौर झालो. आमदार महापौर छगन भुजबळ पहिलाच, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना वाढवण्यासाठी गावागावातून काम केलं. मला कधी डावललं नाही. तीच गोष्ट काँग्रेसमध्ये आल्यानंतरही. 18 लोकांना घेऊन काँग्रेसमध्ये आलो तेव्हा कॅबिनेट मंत्री मी आणि दोन तीन लोकांना मंत्रीपदाची शपथ दिली. काँग्रेसने 10 दिवसांत मंत्रीपदाची शपथ दिली. काहीतरी नाव असेल काहीतरी इतिहास असेल ना पाठीमागे म्हणूनच महसूल मंत्रीपदाची शपथ दिली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

1985 ला आमदार होतो तेव्हाही मी वन मॅन आर्मी होतो. काँग्रेसमध्ये विरोधीपक्ष नेता असताना जीवघेणा हल्ला झाला. खोट्या केसेसमध्ये अडकवले पण त्यातूनही मी बाहेर पडलो. त्यानंतर ऐनवेळेला निवणडुकीला सात आठ महिने असताना पवार साहेबांना काढलं आणि दोन काँग्रेस झाल्या. तेव्हा मी पवार साहेबांसोबत गेलो. तेव्हा तुम्हाला कल्पना असेलच सगळ्यांनी मला पवारसाहेबांसोबत जाऊ नका, असं सांगितलं. मी तेव्हा त्यांना सांगितलं मी पवारसाहेबांना नाही सोडणार आणि मी पवारसाहेबांसोबत राहिलो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Popular Categories

spot_imgspot_img