back to top
Saturday, September 13, 2025
13.8 C
London

80 वर्षांच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीला अटक, रायगडमधील संतापजनक घटना | 80-year-old man rapes minor girl, accused arrested, shocking incident in Raigad |

80-year-old man rapes minor girl

रायगडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. 80 वर्षींय व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून त्यांच्याविरोधात माणगावच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील हमजा नावाच्या व्यक्तीने गावात किराणा दुकान आहे. अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत दुकानात नेत तिच्यावर अत्याचार केला.

80-year-old man rapes minor girl

नेमके काय घडले?

रायगड जिल्ह्यातील एका 80 वर्षीय व्यक्तीचे किराणा दुकान आहे. त्याच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला तुला चॉकलेट देतो असे म्हणत हमजा नामक व्यक्तीने दुकानात बोलवले. ती दुकानात आली असता मुलीचा विनयभंग करून तिच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण होईल असे कृत्य केले. या प्रकारानंतर मुलीने रडत रडत घरी जात पालकांना याबाबत माहिती दिली. चिमुकलीने आपबिती सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या वडिलांनी गोरेगाव पोलिसांनी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. यानंतर आरोपीवर बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी हमजाला अटक केली आहे.

80-year-old man rapes minor girlजतमध्ये अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार

जात पूर्व भागातील एका गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन लेकीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम बापावर रात्री उशिरा उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. जत पूर्व भागातील एका गावात 13 वर्षीय मुलीच्या असहायतेचा फायदा घेत बापाकडून गेल्या चार महिने अत्याचार सुरू होता. सदरचा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला होता. तिने याबाबत पतीला सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकत नव्हता. अखेरीस शुक्रवारी सकाळी महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.

(टॅगस्टोट्रांसलेट) 80 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला (टी) आरोपी अटक (टी) रायगडमध्ये धक्कादायक घटना

Also Read

ipl 2025: CSK vs MI सामना किती वाजता सुरू होईल? आपण कोठे आणि कसे पाहू शकाल

 

Popular Categories

spot_imgspot_img