वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात नातेवाईकाकडे आलेल्या महिलेचा तिघांनी विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर शुक्रवारी ता. 18 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वसमत ग्रामीण पोलिसांनी तातडीने पथके पाठवून त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिला तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती. त्या ठिकाणी नातेवाईकांची भेट घेऊन तिच्या माहेरच्या मंडळींना भेटण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणावरून परत नातेवाईकांकडे गेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तिघे जण एका दुचाकी वाहनावर गावात आले होते.
यावेळी सदर महिला घराबाहेर असतांना त्यांनी त्या महिलेस मोबाईलमधील काही छायाचित्र दाखविले. त्यानंतर तिला बळजबरीने ओढून दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला तसेच सोबत येण्याची धमकी दिली. मात्र या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडा ओरड केली. यावेळी दोघांनी त्या महिलेचा विनयभंग केला. या आरडा ओरडमुळे महिलेचे नातेवाईक आल्यानंतर तिघांनी पळ काढला.
दरम्यान, सदर प्रकार त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने वसमत ग्रामीण पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, विनायक जानकर, विजयकुमार उपरे, अविनाश राठोड, नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने तातडीने राजाराम जोगदंड, गंगाप्रसाद अडकिणे, विष्णू कदम यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरु केली असल्याचे सुत्रांनी सांगितले. उपनिरीक्षक संतोष मुपडे पुढील तपास करीत आहेत.
(टॅगस्टोट्रांसलेट) एखाद्या नातेवाईकाला भेटायला आलेल्या एका महिलेचा विनयभंग झाला (टी) वासमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध एक खटला नोंदविला गेला.
