back to top
Tuesday, July 1, 2025
28.8 C
London

Nagpur : प्रेयसीने दुर्लक्ष केल्याने प्रियकराचे संतापत रूप; तीन दुचाकींना पेटवून दिलं, नागपुरात गोंधळ

प्रेमिकेने बोलणे बंद केल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरी गोंधळ घालून वाहनांची जाळपोळ केली. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पळून गेलेल्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे.

प्रेमात अनेकदा कठीण प्रसंग येतात. अशा वेळी समजून घेत मार्ग काढायचा असतो. परंतु या प्रकरणात प्रियकराने थेट वाहनेच जाळली. खरे तर प्रेयसीने कुटुंबीयांच्या दबावाने बोलणे बंद केले होते. बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या घरी गोंधळ घालून वाहनांची जाळपोळ केली. ही थरारक घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्नेहल सुनील अंबादे (वय २२,रा. कपिलनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो पेंटिंगचे काम करतो.

स्नेहलचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेयसीसोबत (वय २२) प्रेमसंबंध आहे. त्यांच्या प्रेमाबाबत तिचा भाऊ अभिषेक याला माहिती मिळाली. त्याने आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे प्रेयसीने स्नेहलसोबत बोलणे आणि भेटणे बंद केले. ती घरीच राहायची. प्रेयसी भेटत नसल्याने स्नेहल संतापला. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला असता भेटु शकला नाही.स्नेहल अंबादे शनिवारी मध्यरात्री प्रेयसीच्या पहिल्या माळ्यावरील खोलीजवळ गेला. यावेळी तिही खोलीत होती. त्याने दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संतापून गोंधळ घालून शिवीगाळ करायला लागला.

याचदरम्यान त्याने घरासमोरील तीन मोपेड जाळल्या. शेजारी जमले. त्यांनी प्रेयसीचा भाऊ अभिषेकला आवाज दिला. अभिषेकने दरवाजा उघडला असता वाहने जळताना दिसली. पाणी टाकून अभिषेक आणि शेजाऱ्यांनी आग विझवली. दरम्यान, स्नेहल पसार झाला. अभिषेकने कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Popular Categories

spot_imgspot_img