back to top
Saturday, September 13, 2025
11.7 C
London

नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या राऊतांकडून मंत्री उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक

 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेत असताना संजय राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उदय सामंत यांचे कौतूक करत त्यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “मी उदय सामंत यांच्या अभिनंदन करतो. त्यांनी राजापूर मध्ये संयमाची भूमिका घेऊन, दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला”. पुढे ते असेही म्हणाले, कोकणात अशा दंगली कधी घडवल्या नव्हत्या. हे कालचे आलेले हिंदुत्वाच्या नावावर आणि दंगली घडवत आहेत. कोकणात हिंदू मुसलमान यांच्या नावावर, कोकणाची राख रांगोळी करायची आहे का? मी आज वाचलं उदय सामंत यांनी संयमाची भूमिका घेतली, राजापूर आणि रत्नागिरी भागात आणि त्यांनी दोन्ही समाजामध्ये जो तेढ काही लोकांनी निर्माण केला होता तो नष्ट केला, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

Popular Categories

spot_imgspot_img