back to top
Sunday, September 14, 2025
9.2 C
London

येथे तयार होणार देशातील पहिले हिंदू गाव, धीरेंद्र कृष्ण शास्री यांचा घोषणा

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्री यांनी हिंदू एकता यात्रेनंतर आता देशातील पहिल्या हिंदू गावाचीमुहूर्तमेढ रोवली आहे. हे गाव येत्या दोन वर्षांत बांधून तयार होणार आहे, धीरेंद्र शास्री यांनी विधीवत वैदिक मंत्रोच्चारात भूमीपूजन करीत या गावाच्या निर्मितीचा शुभारंभ केला आहे. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम ( गढा ) येथे बांधल्या जाणाऱ्या या हिंदू गावात सुमारे १,००० कुटुंबे स्थायिक होणार आहेत.

बागेश्वर धाम जनसेवा समिती सनातन धर्मप्रेमींना जमीन देणार आहे. ज्यावर इमारती बांधल्या जातील. पहिल्याच दिवशी, दोन कुटुंबांनी येथे स्थायिक होण्यास सहमती दर्शविली आणि कागदपत्रे पूर्ण केली. याशिवाय, या हिंदू गावात घरे बांधण्यासाठी सुमारे ५० लोक पुढे आले आहेत.  धीरेंद्र शास्त्री यांनी वैदिक मंत्रांच्या योग्य जपाने भूमिपूजन करून या गावाची पायाभरणी केली.

सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे

यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री कन्यापूजनही केले आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न हिंदू घरापासून सुरू होते असे ते यावेळी म्हणाले. जेव्हा हिंदू कुटुंबे, हिंदू समाज आणि हिंदू गावे निर्माण होतील तेव्हाच हिंदू तहसील, हिंदू जिल्हा आणि हिंदू राज्याचे स्वप्न साकार होईल. ते म्हणाले की, हे फक्त एक गाव नाही तर हिंदू राष्ट्राचा पाया आहे. हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असेही बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले.

Popular Categories

spot_imgspot_img