आदित्य ठाकरे हे ड्रग्सच्या व्यापारात सहभागी आहेत. तसंच उद्धव ठाकरे देखील आरोपी असल्याचा खळबळजनक आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा वापर केला, असं देखील ओझा यांनी म्हंटलं आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियान आणि वकील निलेश ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केलेल आहे. तर या संपूर्ण आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, त्यांना जे बोलायचं ते बोलत राहुदे, मी काहीही बोलणार नाही, असं म्हंटलं आहे.