back to top
Saturday, September 13, 2025
16.3 C
London

Akola News: अकोला: दारूच्या नशेत पीएसआयची डॉक्टराला शिवीगाळ, निलंबनाची धमकी!

Akola News : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात PSI अर्थातच पोलिस अधिकारी (Akola Police)आणि एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पीएसआय (PSI) अर्थातच पोलीस अधिकारी दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत निलंबनाच्या कारवाईची धमकी देत आहे, असा आरोप करीत या वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रार केलीय. तू आरोग्यसेवा देण्यात हजर का राहत नाही? या कारणांवरून या दोघांमध्ये हा शाब्दिक वाद झाल्याचे बोलल्या जातंय.

निलंबनाच्या कारवाईची धमकी, पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी 

दरम्यान, अकोल्यातीलचं दहीहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर आणि दहीहंडा पोलीस स्टेशनचे PSI प्रभुदास गंडलिंगे यांचा वादाचा हा video सर्वत्र वायरल होत आहे. गंडलिंगे या पीएसआयने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची वाद घालत ‘तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही?’, असा सवाल विचारत थेट डॉक्टराला शिवगाळ घातलीय. इतकंच नाही तर पुढं निलंबनाच्या कारवाईची धमकी दिलीय. असा आरोप या डॉक्टराने तक्रारीतून केलाय. या पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्याने अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केलीय. शिवीगाळ करणाऱ्या पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी आता या डॉक्टराकडून होत आहे. नेमकं आता संपूर्ण प्रकार नंतर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Popular Categories

spot_imgspot_img