back to top
Wednesday, June 18, 2025
25.8 C
London

‎Akola News l शेगावच्या श्री गजानन महाराज पालखीचे 4 जूनला आगमन: श्री गजानन महाराज पालखी सत्कार समितीचा आढावा

विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांचे पालखीचे आषाढीनिमित्त भजनी, दिंडी, अश्व, हत्ती आणि ७०० वारकऱ्यांसह बुधवारी, ४ जून रोजी सकाळी ७ वाजता अकोला येथे आगमन होत आहे. गेल्या ५ दशकांपासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी

या सभेत श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी पालखीच्या दोन दिवसीय मुक्कामातील आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा मानस व्यक्त केला. तसेच गतवर्षी आलेल्या पालखी उत्सव खर्चाचा आढावा समितीचे कोषाध्यक्ष नारायण भाला यांनी उपस्थितांसमोर मांडला तसेच भाविक भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्याचे ठरवले. हरिभजनाचा लाभ व्हावा, समता बंधुभाव दृढ व्हावा यासाठी दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय मैदानावर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे, तरी भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या सभेला रामराव घाटे, उपाध्यक्ष प्रकाश खंडेलवाल, उपसचिव दिनेश पांडव, शोभायात्रा प्रमुख नारायणराव आवारे, बाबासाहेब गावंडे, केशव पाटील, अरविंद पाटील, रजनीकांत सप्रे, श्यामसुंदर मालपाणी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर फुलकर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव गजानन ढेमे यांनी केले.

सर्व अकोलेकरांनी श्रींच्या पालखीच्या ठिकठिकाणी स्वागताच्या तयारीस लागावे व शिस्तीचे पालन करावे. पालखीच्या मार्गाने पर्यायी मार्गाचा वापर करावा जेणेकरून पालखीला त्रास नाही व्हावे आणि भरपूर संख्येने दर्शनाचे, प्रसादाचे लाभ घ्यावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा निघणार आहे. सकाळी ११ वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट, जुने शहर येथून निघेल. डाबकी रोड श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, काळा मारुती मंदिर, सुशील बेकरी समोरून, लोखंडी पुलावरून, मोठा पूल, महानगरपालिका चौक, चांदेकर चौक, चिवचिव बाजार प्रवेशद्वारातून, स्वावलंबी विद्यालय समोरून, मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात पालखीचा मुक्काम राहील.

Popular Categories

spot_imgspot_img