back to top
Wednesday, June 18, 2025
25.8 C
London

Amravati Chikaldhara : अमरावतीत भीषण अपघात टळला! चिखलदऱ्यात कार 500 फूट दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली

महाराष्ट्र भूस्खलनातील कार धक्कादायक फोटो: पावसाळ्यामध्ये रस्त्यावर वाहने सावकाश चालवा असं अनेकदा पोलिसांकडून जनजागृतीदरम्यान सांगितलं जातं. पावसाळी सहलींसाठी निसर्गरम्य ठिकाणांवर होणारी गर्दी लक्षात घेता असा पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक आणि पोलीसांची सुरक्षाही पुरवली जाते. मात्र अशा ठिकाणी अनेकदा अती उत्साही पर्यटक जीवाशी खेळ करावा असे काही प्रकार करतात. असाच एक प्रकार पावसाचं आगमन झाल्याचं पाहिल्याच दिवशी अमरावतीमध्ये घडला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील चिखलदऱ्यामध्ये एक कार पाचशे फूट खोल दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. अचानक आलेल्या पावसाने माती खचल्याने ही कार डोंगरमाथ्यावरुन दरीच्या बाजूला सरकली. टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची ही कार पाचशे फूट खोल दरीत कोसळणार असं वाटत असतानाच ही कार डोंगरमाध्यावर अर्धवट अवस्थेत अडकून पडली.

सुदैवाने या कारमधील चारही युवकांचे प्राण वाचले आहे. ही डोंगरमाध्यावर अर्थवट दरीत कलंडलेली आणि अर्धवट वर असलेली कार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. या कारमधील लोकांचं काय झालं याबद्दल ही कार पाहणारा प्रत्येकजण विचारत होता. मात्र कोणाचीही जिवीतहानी झाली हे ऐकल्यानंतर बघ्यांचाही जीव भांड्यात पडला.

कार का खचू लागली?

चिखलदराच्या गाविलगड किल्ला परिसरातील ही घटना घडली. या विचित्र अपघाताची माहिती स्थानिक पोलीस व वन विभागाला देण्यात आली. काही तासांनंतर पोलीस आणि वन विभागाने संयुक्तरित्या ही कार क्रेनच्या मदतीने खेचून बाहेर काढली. अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी या कारने प्रवास करणारे चारही पर्यटक तरुण कारमध्ये बसले होते. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने जमीनीवरुन दरीच्या दिशेने वहणाऱ्या पाण्याचा प्रवास वाढला. कारमध्ये बसलेल्या तरुणांना याचा अंदाज आला नाही. पावसाच्या पाण्यामुळे डोंगरमाध्यमावर ज्या ठिकाणी कार उभी केली होती तिथली माती खचायला सुरुवात झाली.

प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला

कार दरीच्या दिशेने खचत असल्याचं पर्यटकांच्या लक्षात आल्याने त्यांनी कारच्या विंडो वाजवून आत बसेलेल्या तरुणांना याबद्दल सांगितलं. तातडीने हे तरुण कारमधून खाली उतरुन दूर जाऊन उभे राहिले. कारमधील वजन कमी झाल्याने कार मातीत रुतून बसली आणि अधिक खचण्याऐवजी मातीत अडकली. वेळीच बघ्यांपैकी काहींनी प्रसंगावधान दाखवून या तरुणांना सतर्क केल्याने त्यांचे प्राण वाचले आणि कारही दरीत कोसळता कोसळता वाचली.

.

Popular Categories

spot_imgspot_img