back to top
Sunday, September 14, 2025
10 C
London
Home Blog Page 10

Yavatmal : प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात गुन्हा दाखल

Yavatmal Crime News : यवतमाळच्या लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरे यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे मालगाडीखाली आत्महत्या केली होती. यावेळी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मृत प्राध्यापक संतोष गोरे यांचे मामेभाऊ शशिकांत भट यांनी बडनेरा रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

 प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात गुन्हा दाखल

यात मृत्यू पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये असलेले 34 जण मला खूप मानसिक त्रास देत आहे, हा त्रास आता माझ्या सहनशक्ती पलीकडे गेलेला आहेत. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. असे या या सुसाईड नोट मध्ये लिहलं होतं. या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेले 34 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे शाळेतच अश्लील चाळे; गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप 

गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात आणि बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतात.

या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे.

स्कॉर्पिओ जेसीबीमध्ये भीषण अपघात; एक जण ठार, तर दोघे गंभीर

वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये  अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओ लोणार तालुक्यातील पांग्राडोळे येथिल असून स्कार्पिओ लोणारच्या दिशेने  जात असताना उभ्या जेसीबीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामधील गंभीर जखमींना वाशिमच्या दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या. 

अधिक पाहा..

Gadchiroli : शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे

गडचिरोली: जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात आणि बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतात. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत आता स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ठाकूर बंधूंची १३ कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली

चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Andhari Tiger Reserve) सफारी बुकिंग मध्ये 16.5 कोटींचा अपहार करणाऱ्या अभिषेक ठाकूर (Abhishek Thakur) आणि रोहीत ठाकूर (Rohit Thakur) यांना ईडीनं चांगलाच दणका दिला आहे. या दोघांची नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर (Chandrapur) येथील 13 कोटी 71 लाखांची चल-अचल संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी देखील ईडीने ठाकूर बंधूंच्या हॉटेल, बार, पेट्रोल पंप आणि घरावर छापेमारी केली होती. 

नेमकं प्रकरण काय?

ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या ठाकूर बंधूंच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन ने 2020 ते 2024 दरम्यान 16.5 कोटींचा अपहार केल्याचा आरोप असून या प्रकरणी वनविभागाच्या वतीने रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून वनविभाग आणि पोलीस विभाग या प्रकरणाचा करत आहेत स्वतंत्र तपास, याच प्रकरणात वन विभागाने ईडी ला पत्र लिहून चौकशीची केली होती मागणी, त्यानुसार 8 जानेवारी ला ईडी ने ठाकूर बंधूंच्या हॉटेल, बार, पेट्रोल पंप आणि घरावर केली होती छापामारी, याच प्रकरणात आता ईडीने ठाकूर बंधूंची संपत्ती जप्त करून मोठा दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात ठाकूर बंधूनी केलेल्या पैशांच्या अपहाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

स्थानिक रामनगर पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने तपास सुरू केला होता. वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स (WCS) चे भागीदार अभिषेक विनोद कुमार ठाकूर आणि रोहित विनोद कुमार ठाकूर यांनी आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्रतिष्ठानची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग, प्रवेश शुल्क, जिप्सी शुल्क आणि मार्गदर्शक इत्यादींसाठी शुल्क गोळा करण्याची जबाबदारी WCS ला देण्यात आली होती, परंतु आरोपींनी कराराच्या अटींचे उल्लंघन केले आणि २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत १६.५ कोटी रुपयांची उधळपट्टी केली असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून ईडी अशा प्रकरणांचा वेगाने तपास करत आहे. तपासातून नवनवीन माहिती समोर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Nagpur l बुलडोझर कारवाईवर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली तीव्र नाराजी l Dnw Updates

नागपूरचे उल्लंघन अद्यतनः उपराजधानीमधील धार्मिक हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खान व आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरांवरील बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कारवाईला घेऊन न्यायालयाने  महापालिकेला कडक शब्दांत फटकारले आहे. हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची घरे पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का? असे परखड प्रश्न न्यायालयाने राज्य सरकार व नागपूर महानगर पालिकेला केले आहे.

बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती देत पालिका आयुक्तांना नोटीस बजावून कारवाईवरील आक्षेपांवर 15 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बुलडोझर कारवाईविरुद्ध फहीम खानची आई जेहरुनिस्सा शमीम खान व अब्दुल हफीजचा मुलगा मो. अयाज अब्दुल हफीज शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने या बाबत निरीक्षण नोंदविले आहे.

बुलडोझर कारवाईवर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली तीव्र नाराजी

दरम्यान, नागपूरच्या चिखलीमधील संजयबाग कॉलनीत फहीम खानचे घर न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच पाडण्याची कारवाई पालिकेने पूर्ण केली. तर महालमधील अब्दुल हफीजच्या घराचा काही भाग पाडण्यात आला. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई लगेच थांबविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या 13 नोव्हेंबर 2024 रोजीच्या निर्णयाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे नमूद करून मुख्य सचिवांना पुढच्या सुनावणीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

..तर न्यायालयाची गरज नाही, आम्ही आमचे निर्णय घेऊ असे जाहीर करा- इम्तियाज जलील

नागपूरमध्ये जे काही घडलं त्याची आम्ही निंदा केली आहे. जी काही हिंसा घडली त्याची देखील निंदा केली आहे. मात्र अलिकडे जे काही नागपूर मध्ये घडलं उत्तर प्रदेशचे बुलडोझर कल्चर जे काही योगी आदित्यनाथ यांनी आणले होते, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. हे सर्व घर तुम्ही बांधून द्या, असं उत्तरप्रदेश सरकारला सांगितलं होतं. आज तेच कल्चर भाजपने इथे आणलं आहे. जे नागपूरमध्ये पाहायला मिळालंय.

जे कुणी दंगलीत सहभागी होते त्यांच्यावर कारवाई करा, जो कुणी कायदा हातात घेत असेल त्यांच्यावर कारवाई करा. पण तुम्ही घर तोडणार त्या घरामध्ये कुणाची तरी आई राहते, त्याच्या आई-मुलांचा, बायकोचं काय दोष आहे? जर असाच कायदा चालणार असेल तर आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगतो तुम्ही सर्व न्यायालयांना ताळे ठोका आणि आता आम्हाला न्यायालयाची गरज नसेल आम्ही आमचे निर्णय घेऊ, असे जाहीर करा. असे परखड मत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.

खासदार म्हस्केंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर: म्हणाले- राऊत उद्धव ठाकरेंची भाकरी खातात पण चाकरी मात्र शरद पवारांची करतात

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची भाकरी खातात पण चाकरी मात्र शरद पवार यांची करतात. आपण कृतघ्नांचे शिरोमणी आहात, असे म्हणत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

नरेश म्हस्के पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर कृतघ्न असते तर राज्यसभेच्या निवडणुकीत तुमचा पराभव केला असता. परंतू आमदारांची इच्छा नसताना देखील तुम्हाला मतदान करायला लावत खासदार केले.

राऊत कृतघ्नांचे शिरोमणी

नरेश म्हस्के म्हणाले की, ज्या आमदारांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात त्याच आमदारांना तुम्ही शिव्याची लाखोली वाहत आहात. त्यामुळे कृतघ्नांचे शिरोमणी आपण आहात, असा टोला म्हस्केंनी राऊतांना लगावला आहे.

संजय राऊतांचे वक्तव्य काय?

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना आत्मपरीक्षण केले पाहिजे. ज्या दिवशी मोदी- शहांचे छत्र उडालेले असेल तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार शिंदे गटाने करणे गरजेचे आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना सर्वांत जास्त ऊर्जा उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे, अशी ऊर्जा त्यांना देऊ नका हा माणूस घात करेल असे सांगणारी लोकं आज त्यांच्याच आवती भोवती ठाण्यात आहे. आताचे ठाण्यातील खासदार-आमदार आहेत त्यांनीच उद्धव ठाकरेंना म्हटले होते की साहेब हा माणूस तुम्हाला धोका देईल, यांची नियत चांगली नाही. आम्ही त्याला साक्षीदार आहोत. एकनाथ शिंदे यांनी टीका सहन केली पाहिजे. राज्यकर्त्याने जर टीका केली तर तो अधिक पुढे जातील. ज्याने आपल्यावर सुरूवातीपासून मेहरबानी केली आहे त्या व्यक्तीवर टीका करताना जरा जपून बोलले पाहिजे.

IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई – | IPL filled the government Treasury, BCCI Dont Pay tax

आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल सहज होते. IPL केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते?

IPL मधून होते कमाई?

IPL ची सर्वात मोठी कमाई मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्समधून होते. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा मिळून 2023 ते 2027 पर्यंतचे आयपीएलचे ब्रॉडकास्ट राइट्स ख़रीदे केले आहेत. त्यासाठी त्यांनी 48,390 कोटी रुपयांची डील झाली आहे. आयपीएलच्या माध्यमातून दरवर्षी 12,097 कोटी रुपयांची कमाई होते. ही रक्कम BCCI आणि फ्रेंचाईज यांच्या दरम्यान 50-50 टक्के अशी वाटून घेण्यात येते.

हे सुद्धा वाचा

BCCI नाही देत कर

धक्कादायक म्हणजे दरवर्षी 12 हजार कोटींची कमाई करणारी BCCI एक रुपया पण कर भरत नाही. आयपीएलच्या या भव्यदिव्य महाकुंभावर सरकार थेट कर आकारत नाही. BCCI ने 2021 मध्ये आयपीएल केवळ क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केल्याचा दावा केला होता. कर न्यायाधिकरणाने BCCI ची ही विनंती मान्य केली होती. त्यामुळे आतापर्यंत आयपीएलवर सरकारकडून थेट कर आकारण्यात आलेला नाही.

मग सरकार कशी करते कमाई?

IPL ही कर मुक्त असावी अशी मागणी असली तरी सरकार यामाध्यमातून कमाई करते. सरकार खेळाडूंच्या पगारावर टीडीएस (TDS) कापून मोठी कमाई करते. 2025 मध्ये मोठा लिलाव झाला. 10 संघांनी खेळाडू खरेदी केले. त्यासाठी 639.15 कोटी रुपये खरेदी केले. या दरम्यान 120 भारतीय आणि 62 परदेशी खेळाडूंची निलामी करण्यात आली. या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या वेतनातून सरकार कर वसूल करते. त्यानुसार भारतीय खेळाडूकडून 10% तर परदेशी खेळाडूंच्या पगारावर 20% टीडीएस सरकार कापण्यात येतो. सरकारला या टीडीएसमधून IPL 2025 मध्ये 89.49 कोटी रुपयांचा कर मिळाला आहे.

केएल राहुल पुढचा सामना खेळू शकेल: दिल्ली कॅपिटलसाठी पहिला सामना खेळला नाही

24 मार्च रोजी त्याच्या मुलीचा जन्म त्याच्या घरी झाला. यामुळे, तो स्पर्धेचा पहिला सामना खेळू शकला नाही.

डीसीचा दुसरा सामना विशाखापट्टणममधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये तिच्या गर्भधारणेबद्दल माहिती दिली.

18 जानेवारी रोजी केएल राहुल यांनी उज्जैनमधील जगातील प्रसिद्ध श्री महाकलेश्वर मंदिरात भगवान महाकलला भेट दिली. त्याने गतिशील अभयारणाची उपासना केली आणि आशीर्वाद घेतला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने YouTube वर माहिती दिली एलिसा हेली यांनी यूट्यूब चॅनेल लिस्टनर स्पोर्टवर सांगितले की हॅरी ब्रूकच्या जागी कोण येते हे पाहणे मनोरंजक असेल. त्याच्याकडे केएल राहुल आहे जो कदाचित प्रथम काही सामने खेळणार नाही. ते आपल्या मुलाच्या जन्माची वाट पहात आहेत. दिल्ली कॅपिटल (डीसी) मध्ये तरुण खेळाडूंची फौज आहे जे काहीही करू शकतात. त्याच्याकडे केएल राहुल देखील आहे जो टी -20 क्रिकेटमधील डावांना बळकट करेल. त्यांना पाहून खूप आनंद होईल.

दिल्ली कॅपिटलने 14 कोटी खरेदी केली दिल्ली कॅपिटल आयपीएल 2025 मेगा लिलावात 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली गेली. यापूर्वी तो लखनौ सुपर जायंट्सकडून तीन वर्षे खेळला होता. लिलावापूर्वी एलएसजी सोडले. राहुलने आयपीएलमध्ये अनेक संघांचे कर्णधारपद साधले आहे, अशा परिस्थितीत असे मानले जाते की फ्रँचायझी त्यांच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. राहुलने आयपीएलमध्ये 4683 धावा केल्या आहेत.

Astrology News : शुक्राची वक्रदृष्टी पडणार; 3 राशींच्या आयुष्यात येणार वादळ!

शुक्र ग्रहाला ज्योतिषशास्त्रात सौंदर्य, प्रेम, समृद्धी, वैभव आणि आरामाचा कारक मानलं गेलं आहे. याच कारणामुळे शुक्राच्या हालचालीतील बदल व्यक्तीच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करत असतात. जर शुक्र ग्रह थेट किंवा प्रतिगामी गतीने फिरत असेल तर त्याचा आपल्या आर्थिक, आरोग्य आणि जीवनातील आरामावर थेट परिणाम होत असतो. शुक्र ग्रह प्रेम आणि आकर्षणाचान् देखील कारक मानला जातो. या कारणास्तव, शुक्राच्या हालचालीतील बदल आपल्या सामान्य जीवनावर परिणाम करतो.

शुक्र ग्रह सध्या मीन राशीत आहे. रविवारी १३ एप्रिलला सकाळी ६:३१ वाजता, शुक्र मीन राशीत वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र वक्री असल्याने काही राशीच्या लोकांना काहीशी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मात्र त्यातही 3 राशी अशा असणार आहेत ज्यांच्यावर शुक्र ग्रहाच्या वक्री होण्याचा वाईट परिणाम होणार आहे. या राशींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. समस्या निर्माण होऊ शकतात.

कोणत्या तीन राशींवर येणार अडचणींचं सावट

मिथुन
मिथुन राशीच्या दहाव्या घरात शुक्राच्या थेट हालचालीचा परिणाम होईल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे शत्रू सक्रिय होऊ शकतात. बॉस किंवा वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. पदोन्नती आणि वेतनवाढीत अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमची नोकरी बदलावीशी वाटेल, पण घाईघाईने काम करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. संयम बाळगा.

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी, शुक्राची थेट हालचाल आठव्या भावावर परिणाम करेल. त्यामुळे अचानक होणारे खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून विशेष काळजी घ्या. काही जुने कर्ज तुम्हाला त्रास देऊ शकते. तुमच्या प्रेम जीवनात अस्थिरता येऊ शकते. जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा.

वृश्चिक
कुंभ राशीच्या लोकांमध्ये पाचव्या घरात शुक्र राशीच्या थेट हालचालीचा प्रभाव दिसून येईल. तुमच्या प्रेम जीवनात, तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. यामुळे, तुमचे ब्रेकअप वाढण्याची शक्यता आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकते. करिअरबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या मुलांशी संबंधित बाबींबद्दल तुम्ही चिंतित राहाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला l Santosh deshmukh case hearing updates next hearing on 10th april

Santosh deshmukh case hearing updates next hearing on 10th april

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात दुसरी सुनावणी पार पडली. यादरम्यान केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला आहे. तर अजून कागदपत्र मिळालेले नाहीत, त्यामुळे आरोप निश्चिती नको असं आरोपीच्या वकिलांनी म्हंटलं आहे. आजची सुनावणी पूर्ण झाली असून पुढची सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.

Beed sarpanch murder causes political storm in Maharashtra: All we know |  India News - Business Standard

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज दुसरी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते. आरोपीचे वकील आणि उज्वल निकम यांच्यात छोटासा युक्तिवाद झाला. यावेळी ही केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं उज्वल निकम यांनी म्हंटलं आहे. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आरोप निश्चितीची घाई करू नये असं म्हंटलं. अद्याप आम्हाला सगळे कागदपत्र मिळालेले नाही त्यामुळे आरोप निश्चिती आत्ताच नको असं आरोपीच्या वकिलांनी म्हंटलं.

Read More

Aditya Thackeray : दिशा सालियान प्रकरण: वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे? – Marathi News | Disha salian case updates aditya thackeray reaction after advocate ojha allegations

तुम्ही एप्रिलमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय का? ‘ही’ 5 बेस्ट ठिकाणे जाणून घ्या – Marathi News | Five best places to visit in april plan a vacation with family

जवळपास प्रत्येकाला कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो. त्यामुळे कामातून वेळ मिळेल तेव्हा लोक आपल्या कुटुंबासोबत फिरतात. एप्रिलमध्येही परीक्षा संपल्यामुळे अनेक जण कौटुंबिक सहलीला जातात. आता तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे, हे समजत नसेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला काही डेस्टिनेशन्स सांगत आहोत, जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

Five best places to visit in april plan a vacation with family

1. तवांग

तवांग हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे सुंदर शहर अरुणाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून 2,669 मीटर उंचीवर आहे. आजूबाजूला सुंदर टेकड्या आहेत ज्या तुम्हाला आनंद देतील. बर्फाच्छादित हिमालय शिखरे या ठिकाणाला अधिकच सुंदर बनवतात. डोंगर, जंगले आणि सुंदर तलाव आहेत. तवांगमध्ये मोठा बौद्ध मठ आहे. तुम्हाला हवं असेल तर ताशी डेलेक ट्रेक हा एक साहसी अनुभव आहे.

2. पचमढ़ी

एप्रिलमध्ये सर्वजण डोंगरावर जातात. एप्रिलमध्ये तुम्हाला मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन पचमढी पाहण्याची संधी मिळणार आहे. सातपुड्याच्या टेकडीवर पचमढीच्या शिखरांपासून दूरवर हिरवळ दिसते. पचमढी येथे येऊन निसर्गसौंदर्य समजून घेता येईल. पचमढीमध्ये भव्य कोरीव लेणी आहेत. पचमढी येथे ही धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी तुम्हाला भुरळ घालेल. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंगही करू शकता.

हे सुद्धा वाचा

3. धर्मशाला

प्रत्येकाला डोंगरावर जायचे असते. चित्रपटात दिसणाऱ्या पूजाविधीत त्यांनी चालावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. एप्रिल महिन्यात अशा ठिकाणी जाण्यासाठी धर्मशाळा हे उत्तम ठिकाण आहे. धरमशाला मिनी तिबेट म्हणूनही ओळखले जाते. धरमशाला मध्ये तिबेटी लोक राहतात. सर्वत्र तिबेटचे झेंडे दिसतील. धर्मशाळेजवळ मॅक्लोडगंज आहे. डोंगरांच्या मधोमध वसलेले हे ठिकाण आल्हाददायक आहे.

4. उटी

उटीचं नाव ऐकताच मन फिरू लागतं. सिनेमातून उटीला सगळ्यांनी पाहिलं असेलच. या सुंदर डोंगराळ गावाला भेट द्यायला कोणाला आवडणार नाही? इथे आल्यावर असं वाटतं की कोणीतरी कॅनव्हासवर पेंटिंग केलं आहे. एप्रिल हा उटीला भेट देण्यासाठी उत्तम महिना आहे. उटीच्या टायगर हिल आणि दोडाबोट्टा शिखरावरील नजारे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. तलाव आणि धबधबेही उटीचे सौंदर्य वाढवतात. चहाच्या बागेकडे लांबून पाहिलं तर यापेक्षा सुंदर काहीच दिसणार नाही याची खात्री पटते.

5. दार्जिलिंग

हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेले दार्जिलिंग हे चहाच्या बागा, टेकड्या आणि दऱ्यांचे सुंदर नंदनवन आहे. पश्चिम बंगाल राज्याचा एक भाग, दार्जिलिंग हा भारतातील सर्वात रोमँटिक डोंगराळ प्रदेशांपैकी एक आहे, जो उन्हाळ्याच्या महिन्यांत आल्हाददायक तापमान आणि सुंदर, पर्यटन भरलेला आहे. दार्जिलिंगला जाण्याचा उत्तम काळ एप्रिल महिना आहे, ज्यादरम्यान तापमान 11 डिग्री सेल्सियस ते 19 डिग्री सेल्सियस दरम्यान असते. पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने हलके लोकरीचे कपडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो.