back to top
Saturday, September 13, 2025
16.3 C
London
Home Blog Page 15

राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाच्या सरी..!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

कसं असेल तापमान?

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर एका दिवसानंतर, IMD ने उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती हळूहळू कमी होऊन तापमान हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवला.

15 मार्च रोजी मुंबई शहराचे पहिले 40 अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड (नवी मुंबई) आणि रत्नागिरीला इशारा जारी केला. “गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान कमी होत आहे आणि राज्याच्या काही भागात दमट आणि कोरडे वातावरण दिसून येईल,” असे IMD चे संचालक सुनील कांबळे म्हणाले.

विदर्भात तीन जिल्ह्यांसाठी High Alert

हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिलाय. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमान इशारा देण्यात आलाय. गेल्या तीन दिवसात चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळीं घेतली आहे. होळी नंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडी जाणवत होती. मात्र त्यानंतर अचानक पारा उंचावला आणि आता मागील 10 दिवसांच्या सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद विदर्भातील सर्वच जिल्ह्यात झाली आहे. मार्चच्या मध्यात तापमान 42 अंश सेल्सियसपर्यंत धडकल्याने आगामी काळात पारा चढा राहील असा अंदाज वर्तविला जात आहे


. वाईब्स (टी) मुंबई (टी) महाराष्ट्र (टी) कोकण (टी) विदर्भा (टी) मराठवाडा (टी) महाराष्ट्र हवामान अद्यतने (टी) महाराष्ट्र हवामानातील ताज्या बातम्या (टी) हवामानातील हवामान (टी) हवामान अद्ययावत (टी) हवामान अद्यतने अद्यतने (टी) हवामान बातम्या (टी) आजचा हवामान अहवाल (टी) मॉन्सून (टी) आयएमडी (टी) मुंबई पाऊस (टी) पाऊस (टी) महाराष्ट्र (टी) महाराष्ट्र हवामानाचा अंदाज (टी) मुंबई हवामान बातमी (टी) मुंबई बातम्या (टी) बातमी (टी) बातमी (टी) बातमी (टी) (टी) Samalaisa मह आजचे आजचे आजचे आजचे आजचे आजचे

बीडमध्ये तरुणाचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू: संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती म्हणत अंजली दमानिय आक्रमक, सरकारवर केली टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. एका ट्रक चालकाला कुटुंबातील लोकांनी दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घड

अंजली दमानिया म्हणाल्या, विलास बनसोडे नावाचा 23-24 वर्षाचा मुलगा हा क्षीरसागर कुटुंबाकडे चार वर्षांपासून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याला मारहाण करून त्याचा मृतदेह रुग्णालयात टाकून ती माणसे गायब झाली. त्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरच्यांना कळवण्यात आले. त्याचे फोटो बघून पुन्हा हादरून निघालो आहोत. जसे संतोष देशमुखांचे फोटो होते, अगदी तसेच चित्र समोर आले आहे. हे सगळे बघून काय बोलावे तेच कळत नसल्याचे दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली. काल एका शिक्षकाने स्वतःला बँकेसमोर गळफास लावून घेत आपले जीवन संपवले. संस्था चालकाकडे पगार मागितला म्हणून त्याने शिक्षकाला सांगितले “तू फाशी घे. म्हणजे तूही मोकळा आणि आम्हीही मोकळे.” सरकार काय करत आहे? सरकार काही पाऊले का उचलत नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. त्या शिक्षकाची तीन वर्षांची मुलगी आणि त्याचे वयोवृद्ध आई-वडील आहेत, त्यांचे पुढे काय? 6 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात त्या शिक्षकाने आझाद मैदानावर आंदोलन केले. काय मिळाले त्यातून? शेवटी त्याला प्राण द्यावे लागले, असे दमानिया म्हणाल्या.

अजित पवार कसले पालकमंत्री?

सरकार आणि विरोधी पक्ष यावर चर्चा का करत नाहीत? कबर, झटका, हलाल हे काय चाललंय? इकडे लोक मरत आहेत, आणि तुम्ही नाटके करत आहात, अशा शब्दांत दमानिया यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे. अजित पवार कसले पालकमंत्री? ते फक्त एकदाज बीडला येऊन गेले. त्यानंतर त्यांच्याकडून एक चकार शब्द ऐकलेला नाही. जे मेले त्यांची नावे अजित पवारांना माहिती सुद्धा नाहीत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

पवारांनी मुंडेंना तिथल्या तिथे धडा शिकवायला हवा होता

अंजली दमानिया म्हणाल्या, शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातले, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या. का तुम्ही त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या होत्या? धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळे घडताना दिसले नसते. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केले, त्यांनी काय शिकवले. आत्ता देखील मला जे तिसरा प्रकरण कळले आहे, शिवसेना उबाठा गटाचे काय कारवाई करतील. ज्याप्रमाणे शिंदे गटातील व्यक्तींना मी सांगून तो बोर्ड उतरवला आणि त्यांचे घर त्यांना परत मिळवून दिले, जर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळे बंद होईल. सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल, हे थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे असे म्हणत अंजली दमानिया आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले.

बीडमधील सर्व पोलिस स्टाफ नव्याने आणण्याची गरज

आता या सर्व प्रकरणांमध्ये कोणाची भेट घेण्यात मला काहीच वाटत नाही. सगळ्यांची भेट घेऊन देखील तीन महिने कोणीच काही कारवाई केली नाही. आता मी कोणाचीही भेट घेणार नाही. मला फक्त वाटते की, हे सगळे थांबले पाहिजे. गृहमंत्र्यांनी हे सगळे थांबवले पाहिजे आणि पहिले तर पूर्ण बीड पोलिस विभाग आहे त्याला बीड जिल्ह्याच्या बाहेर टाकून सर्व पोलिस स्टाफ नव्याने आणण्याची गरज आहे आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज

बीड पोलिसांनी आपल्या नेमप्लेटवरती फक्त आपले नाव लावायचे आडनाव लावायचे नाही यावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, तिथे सगळ्यांना सगळ्यांची जात माहिती आहे. आता आपण या सर्वांत जातीपातीत नको पडूया. आत्तापर्यंत जी जी प्रकरणे समोर आली ती सर्व जातीच्या लोकांचे आहेत. सगळ्या जातीतल्या लोकांनी सगळ्या जातीच्या लोकांना मारले आहे. त्यामुळे तिथे जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

“…तर या राज्याची राख-रांगोळी होईल”, संजय राऊतांचा घणाघात..!

“आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्या स्वतःवरचा नियंत्रण संपलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 3000 च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का?” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेला वाद आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांसह विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आला. “जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता, तेव्हा या देशात काही लोकांनी परिस्थिती निर्माण केली. हा देश विभाजनाकडे चालला आहे. 1947 च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत मला फार फरक दिसत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

दुर्दैवाने देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलाय

“जेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला. त्या पंडित नेहरू यांचे मान्य होते भारत याचा मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणीही असेल. हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील हा देश जाऊ देणार नाही. आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्या स्वतःवरचा नियंत्रण संपलेला आहे. त्यांना फक्त दंगली घडवणं. मशिदींवर हल्ली करणे, हिंदू तरुणांची डोकी भडकवणे, या महाराष्ट्रामध्ये 3000 च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का?” असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखाला देशाचे नाव बदलायचे

“बजरंग दल असेल, विश्व परिषद असेल, शेतकरी मेले जे हिंदू नाही का महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यांमध्ये 3000 च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छिणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांना या देशाचे नाव बदलायचे आहे. धार्मिक अभिष्टाने करायचे आहेत किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, त्यांना भडकवले जात आहे. इतर काही संघटना आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती आमचे सरसंघ चालक मोहनराव भागवत कधी बोलले ते दिसले का?” असाही टोला संजय राऊतांनी लगावला.

“शिवसेना हिंदुत्ववादी संघ पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी हा विषय घेऊन राजकारणात आलो. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो. पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करत बसले आहेत. महाराष्ट्र हा पेटवायला निघाले आहेत. अशाने या राज्याची राख रांगोळी, हे राज्य नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हे राज्य नष्ट व्हावं हे काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले आहे का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला हाफ चड्डीवाले म्हणून बोलत होते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना शिव्या घालत होते. ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

“हिंदू मुसलमान याला मटणाचा दुकान वेगळा आणि त्याला मटणाचा दुकान वेगळं. देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर हे सहन कसे करतात. सर संघचालक यांना जर राष्ट्राची खरी चिंता असेल तर हे सहन कसे करतात”, असाही सवाल राऊतांनी केला.

‘आता ती चूक पुन्हा नाही’, भारताबाबत नेमकं काय म्हणाले कॅनडाचे होणारे नवे पंतप्रधान?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे युग आता संपले आहे. खलिस्तानवाद्यांचे समर्थक असलेल्या ट्रुडो यांच्या काळात भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते. आता नवे पंतप्रधान होणारे मार्क कार्नी यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मौन सोडले आहे.

कॅनडाला भारतासोबत चांगले संबंध हवे असून भारतासोबत व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ ट्रुडो यांच्यासारखी चूक आपण करणार नाही, असे त्यांनी हावभावात सांगितले.

काही तासांपूर्वी लिबरल पक्षाच्या नेतेपदी निवड झालेल्या मार्क कार्नी यांना 85.9 टक्के मते मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिकेने प्रचंड शुल्क लादले असताना ते कॅनडाचे पंतप्रधान होणार आहेत. यामुळे दोन्ही शेजारी देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

ट्रुडो यांनी जानेवारीमध्ये आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती, परंतु नवीन पंतप्रधानपदाची शपथ होईपर्यंत ते पदावर राहतील. कॅनडाचे पंतप्रधान होणारे मध्यवर्ती बँकेचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी हे 59 वर्षांचे आहेत. अमेरिकेने लादलेल्या शुल्काबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कॅनडाला समविचारी देशांशी व्यापारी संबंधांमध्ये वैविध्य आणायचे आहे आणि भारतासोबतचे संबंध पुन्हा दृढ करण्याची ही संधी आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची सखोल जाण

व्यापारी संबंधांबाबत समान भावना असायला हवी आणि मी पंतप्रधान झालो तर ते अधिक बळकट करू इच्छितो, असे ते म्हणाले. कार्नी यांना भारताच्या अर्थव्यवस्थेची सखोल जाण आहे. जानेवारीपर्यंत ते ब्रुकफिल्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या संचालक मंडळाचे प्रमुख होते. रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्यूएबल एनर्जी, प्रायव्हेट इक्विटी अशा विविध क्षेत्रांत सुमारे 30 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या भारताविषयी ब्रुकफिल्ड आशावादी होते.

कॅनडा-इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष रितेश मलिक यांनी कार्नी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. एक अनुभवी अर्थतज्ज्ञ म्हणून कार्नी आणि ब्रुकफिल्ड यांच्यासोबतचा अनुभव या नात्याचे महत्त्व अधोरेखित करतो, असे ते म्हणाले. व्यापाराभिमुख परराष्ट्र धोरण असावे आणि सध्याच्या परिस्थितीत कॅनडा-भारत संबंध सुधारतील, हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मला वाटते.

कॅनडाचे नवे पंतप्रधान भारतासोबतच्या संबंधांबाबत नवा दृष्टिकोन घेतील आणि यामुळे आर्थिक आणि सामरिक संबंध नव्या उंचीवर नेऊ शकतील, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी जस्टिन ट्रुडो यांनी उघडपणे भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताकडे बोट दाखवले होते, तर भारताने ते साफ फेटाळून लावले होते. त्यामुळे आता कॅनडा आणि भारत येत्या काळात पुन्हा जवळ येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RCB IPL l हे खेळाडू आरसीबी ला चॅम्पियन बनवतील!

आयपीएल 2025: आयपीएल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यावेळी सर्व संघांची तयारी जोरदारपणे चालू आहे. याची सुरुवात 22 मार्च रोजी केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यापासून होईल. दरम्यान, एका वर्षाला पुन्हा प्रत्येकाच्या मनात एक मोठा प्रश्न असतो. यावेळी आरसीबीचे काय होईल. हा संघ प्रथमच आयपीएल विजेतेपद जिंकू शकेल. मागील हंगामातील चॅम्पियन केकेआर बनवणारा खेळाडू यावेळी आरसीबीकडून खेळत आहे. आपल्याला काय माहित आहे की तोच खेळाडू आरसीबीला प्रथमच विजेता बनवितो.

आरसीबी फिल सलाट केकेआर वरून आले

आम्ही फिल सलाटबद्दल बोलत आहोत. फिल्ट केकेआरसाठी आयपीएल खेळत होता म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स गेल्या वर्षी. जरी सर्व खेळाडू विजेतेपद जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करतात, परंतु फिल सलत यांनी केलेल्या कामानंतर संघाचा विजय सुलभ झाला. ते संघासाठी उघडत होते. जेव्हा फिल सलाट आणि सुनील नारायणची जोडी केकेआरसाठी उतरायची तेव्हा एक मोठा आवाज सुरू झाला. संघाला पुढे नेण्यात या जोडीने खूप योगदान दिले.

फिल सलतने केकेआरसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली

शेवटच्या हंगामात बोलताना फिल सालटने 12 सामने खेळत असताना 435 धावा केल्या. यामधील त्याची सरासरी 39.55 होती आणि तो 182 च्या स्ट्राइक रेटवर धावा करत होता. या दरम्यान, त्याने 4 अर्ध्या -सेंडेंटरी देखील केल्या. जर आपण फिल सलतच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीबद्दल बोललो तर 21 सामने खेळून या स्पर्धेत त्याने 653 धावा केल्या आहेत. यापूर्वी तो सन 2023 मध्ये दिल्ली कॅपिटलमध्ये खेळत होता. मग त्याने केवळ 9 सामने भेटले आणि 218 धावा केल्या.

आरसीबीने मीठासाठी 11.50 कोटी रुपये खर्च केले आहेत

आरसीबीने फिल सलतसाठी एक मोठी रक्कम खर्च केली आहे. लिलावादरम्यान, आरसीबीने आपल्या दरबारात 11.50 कोटी रुपयांमध्ये मीठ बनविला होता. यावेळी तो आरसीबीसाठी विराट कोहलीसह डाव सुरू करेल अशी प्रत्येक शक्यता आहे. जर फिल सलतची फलंदाज पुढे गेली तर आरसीबी सामना जिंकेल आणि चॅम्पियन देखील चॅम्पियन होईल. असं असलं तरी, क्रिकेटमधील भाग्यवान आकर्षणाचा ट्रेंड खूप उच्च आहे. या वेळी केकेआरचा रोगण काय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे हे आपल्याला माहिती आहे आणि संघाने बर्‍याच वर्षांपासून ज्या शीर्षकासाठी ताबा मिळविला आहे, तो दिवस येईल.

वाचा

रोहित शर्माचा हा जागतिक विक्रम आता खंडित होणार नाही, पाकिस्तानने बाबर आझमबरोबर हा खेळ केला आहे

हे ढाकड सर्व -राउंडर आयपीएल 2025 मध्ये गोलंदाजी करण्यास सक्षम होणार नाही, मोठे अद्यतन समोर आले

Pune Rape Case l पुणे पुन्हा हादरलं! स्वारगेटनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तरुणीवर बलात्कार

Pune Rape Case l पुणे पुन्हा हादरलं! स्वारगेटनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तरुणीवर बलात्कार

गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. यानंतर पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तरुणीवर बलात्कार झाला आहे. परिचयाच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुण्यात स्वारगेट चे घटना ताजी असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली. ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केला.  इतकच नव्हे तर तिला सोशल मीडियातून वारंवार धमकी दिली जात आहे. असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने तक्रार करुन वीस दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे. तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले. यावर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

14 वर्षीय विद्यार्थीनीवर रिक्षा चालकाने अत्याचार

यवतमाळच्या आर्णीमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थीनीवर रिक्षा चालकाने अत्याचाराचा प्रयत्न केला.  यावेळी विद्यार्थीनीने  आरडाओरड केल्याने  एका व्यक्तीने तिला शाळेबाहेर सोडलं. त्यानंतर विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरमध्ये  दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागातर्फे स्वतंत्र चौकशी सुरू आहे. या चौकशीअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, या आपल्या भूमिकेचा राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पुनरुच्चार केला.

.

आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, तिसऱ्यांदा करणार निकाह? Aamir Khan Confirms Relationship With Gauri Spratt

Aamir Khan Confirms Relationship With Gauri Spratt

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान लग्नाच्या बाबतीत मात्र नेहमीच चर्चेत असतो. पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न केल्याने आमिर चांगलाच चर्चेत आला होता. आता आमिर तिसऱ्या लग्नामुळेही चर्चेत आला आहे. त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याने त्याच्या लव्ह लाइफची घोषणा केली आहे. आमिरने त्याच्या गर्लफ्रेंडला थेट मीडियासमोरच आणलं आहे. लवकरच आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आमिर खानचा उद्या 14 मार्च रोजी 60 वा वाढदिवस आहे. एक दिवस आधीच आमिरने पॅपराजींसोबत वाढदिवस दणक्यात साजरा केला. यावेळी त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहे. आमिरने केवळ वाढदिवसच साजरा केला नाही तर त्याची गर्लफ्रेंड गौरीचीही पॅपराजीशी भेट घालून दिली. मात्र गौरीचा फोटो कोणत्याच सोशल मीडियाला पोस्ट झालेला नहाी. आमिरने प्रायव्हसीचा भाग म्हणून गौरीचे फोटो शेअर न करण्यास पॅपराजींना सांगितलं. आमिरची नवी गर्लफ्रेंड बॉलिवूडशी संबंधित नाही. ती बंगळुरूची राहणारी आहे. दोघेही दोन ते तीन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे गौरीला एक 6 वर्षाचा मुलगाही आहे.

शाहरुख, सलमानशी गाठीभेटी

शाहरुख आणि सलमान खान 12 मार्च रोजी आमिर खानच्या घरी गेले होते. यावेळी तिघांनी मिळून वाढदिवस साजरा केला. एवढेच नव्हे तर आमिर खान सलमानला सोडायला त्याच्या कारपर्यंत आला होता. तर शाहरुख खान मीडियापासून चेहरा लपवत निघून गेला होता. दरम्यान, आज वाढदिवस साजरा करताना आमिर खानच्या गर्लफ्रेंडने शाहरुख खान आणि सलमान खानशी भेट झाल्याचं सांगितलं.

25 वर्षापूर्वीची भेटी

दरम्यान, आमिर खान आणि गौरीची पहिली भेट 25 वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा दोघांमध्ये असं काहीच नव्हते. ती एक नॉर्मल भेट होती. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये कार्यरत होती. गौरी आमिर खानच्या कुटुंबीयांनाही भेटलेली आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याबाबत कुटुंबातून काहीच अडचण नसल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गौरी आमिर खानला सुपरस्टार मानत नाहीये.

आधीच दोन टेबल्स

आमिर खानने 1986मध्ये रिना दत्तासोबत पहिला निकाह केला होता. 16 वर्ष दोघांनी संसार केला. त्यानंतर 2002मध्ये दोघे वेगळे झाले. पहिल्या बायकोकडून आमिरला इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. त्यानंतर 2005मध्ये त्याने किरण रावशी निकाह केला. हे लग्नही जास्त काळ टिकलं नाही. दोघांनी 2021मध्ये तलाक घेतला. आमिर आणि किरणला आजाद नावाचा मुलगा आहे. तर आमिर आणि गौरीचं नातं गेल्या दोन ते तीन वर्षापासूनचं आहे.

Kolhapur l पसरणी घाटात कार 200 फूट खोल दरीत कोसळली: पुण्यातील दोन पर्यटक ठार, दोघे गंभीर

कोकणात फिरण्यासाठी गेलेले पर्यटक महाबळेश्वर, पांचगणी , वाईमार्गे परत पुण्याला जात असताना पसरणी घाटातून त्यांची कार 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघे ठार तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरचे रहिवा

पुण्यातील लोणी काळभोरचे रहिवासी असलेले बजरंग पर्वत काळभोर, वैभव काळभोर , सौरभ जालिंदर काळभोर आणि अक्षय मस्कू काळभोर हे दोन दिवसांपूर्वी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वर, पांचगणी , वाईमार्गे पुण्याला जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ( एमएच 12 क्यूटी 7711) पसरणी घाटातून 200 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. त्यातील सौरभ जालिंदर काळभोर आणि अक्षय मस्कू काळभोर या दोघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमींवर बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोकण दर्शनानंतर परत जाताना पुण्याच्या पर्यटकांवर ऐन होळी सणादिवशीच काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते आणि वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना दरीतून दोरखंडाच्या साह्याने वर आणले. यावेळी पसरणी घाटात बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळं घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसरणी हा घाट तीव्र उताराचा आहे. त्यामुळे पांचगणी हून वाईला येताना या घाटात वाहनांचे भीषण अपघात होतात. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था तसेच कमी उंचीचे कठडे असल्यानं वाहने दरीत कोसळतात. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी संरक्षण कठड्यांची उंची वाढविणे गरजेचे बनले आहे.

.