back to top
Saturday, September 13, 2025
16.3 C
London
Home Blog Page 4

Pandharpur : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान, विठुरायाला वाहिलेले हार थेट कचऱ्यात

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हार थेट नगर परिषदेच्या कचरा डेपोत फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. दररोज दोन टन हारांची विल्हेवाट कचरा डेपोत लावली जात आहे. ज्या ठिकाणी शहरातील सगळा कचरा टाकला जातो त्याच ठिकाणी भाविकांनी श्रद्धेने आणलेल्या हारांची फेकले जात आहे. या प्रकारामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यासह वाल्मीक संघटनाही आक्रमक झाली आहे.

वाल्मीक संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हारांपासून धूप, उदबत्ती असे उपपदार्थ तयार करा. नाही जमले तर शिर्डी प्रमाणे विठ्ठल मंदिरात हराला बंदी घाला किंवा भाविकांनी आणलेले हार भाविकांच्या हातात प्रसाद म्हणून देऊन भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखा, अशी मागणी मंदिर समिला केली आहे. जर मागणी मान्य न झाल्यास मंदिर समितीच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर!: 21 ते 24 मे – काळजी घ्या! राज्यात वादळसदृश पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची आर्थिक होरपळ

अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रवातामुळे महाराष्ट्रात हवामान बिघडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, 21 ते 24 मे दरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मुंबई, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात गडगडाटी वादळ, विजांचा

या पार्श्वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने 22 मेपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाणवेल, असं स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोर कायम असून, अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. डाळिंब, कांदा, भुईमूग, पेरू, केळी अशी अनेक फळबागं आणि पिकं वाऱ्याने मोडून पडली आहेत. काही जिल्ह्यांत जीवितहानीसह जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

पंढरपूर – डाळिंब उत्पादकांना फटका बोहाळी गावातील शेतकरी अंबादास हावळे यांच्या 16 एकर डाळिंब बागेचे वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः जमीनदोस्त नुकसान झालं आहे. डाळिंब झाडं मोडून पडली असून, अंदाजे 15 लाख रुपयांचा फटका बसला आहे. यंदा दर चांगला होता, म्हणून शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता, पण हाती काहीच उरलं नाही.

भुईमूगाची शेंग फोडली… वाशिममध्ये उन्हाळी भुईमुगाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, पाऊस वेळेआधी आल्यानं शेंगा जमिनीतच राहिल्या आणि अंकुर फुटल्याचा प्रकार घडला आहे. 5,143 हेक्टरवर भुईमुगाची लागवड झाली होती. आता संपूर्ण पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

कांदा काढायच्या आधीच पाणी! बीड तालुक्यातील साक्षर पिंपरी गावातील शेतकरी शिवराज यांच्या कांद्याचं पीक वादळी पावसामुळे वाहून गेलं आहे. 50 हजार रुपये खर्च करून लावलेला कांदा, काढणीला आला असतानाच हवामानाने दगा दिला. शेतकरी म्हणतात, “तलाठी, मंडळ अधिकारी कुणीच बांधावर फिरकलं नाही.”

जनावरं दगावली, घरं पडली लोहारा, उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम भागात 36 गावांत वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून, 3 जण जखमी आहेत. 28 जनावरांचा मृत्यू, 56 घरांची पडझड झाली आहे. पंचनामे सुरू असून, नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांनी आक्रोश केला आहे.

पावसाचा जोर कायम लातूर जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळला. रेणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाचा इशारा 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असून, 6 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र, त्याआधीच पावसाची सशक्त सुरुवात होत असून, पुढील काही दिवस नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अत्यंत सतर्क राहावं, असा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात मुसळधार : मंगळवारी पुणे शहर आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस झाला. झाडे कोसळणे, रस्त्यावर पाणी साठले, गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. ३ ठिकाणी होर्डिंग्ज कोसळले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(टॅगस्टोट्रांसलेट) महाराष्ट्र कंसात वादळ पावस! 21-22 मे रोजी अलर्ट (टी) पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Yavatmal : मुख्याध्यापिकेचा थरारक कट: पतीचा खून करून मृतदेह जाळण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत

यवतमाळ: महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे. मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारले. शंतनू देशमुख (32, रा. सुयोगनगर) यांचा मृतदेह जंगलामध्ये निर्जनस्थळी अर्धवट स्वरूपात जळाल्याचा आढळून आलं होतं, पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्यध्यापिकेने तीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंतनू अरविंद देशमुख (32, रा. सुयोगनगर) असं मृत पतीचं नाव आहे. तर निधी शंतनू देशमुख असं आरोपी पत्नीचं नाव आहे. दोघेही एकाच शाळेत शिकवत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या नवरा बायकोचं वारंवार भांडण होत असे, त्यातूनच निधीने आपला पती शंतनू याला संपवल्याची माहिती समोर आली आहे. 13-14 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह आढळला होता. निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला होता. त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती  टाकला होता. त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त 

शंतनू आणि निधी यांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या प्रकरणी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला त्या दिवसानंतर तो गायब झाला होता. त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा ठरली

कशी पटली मृतदेहाची ओळख

अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरिरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करण्यात आले होते. मृताची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजुबाजुचे जिल्हे वाशीम वर्धा अमरावती ग्रामीण दाखल बेपत्ता लोकांची माहिती घेण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमांचा शोध घेतला असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख हा दिनांक 13 मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. 18 मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले.

गुगलवरून तयार केले विष

शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. लग्नानंतर काही दिवस आयुष्य चांगले चालले, पण शंतनूला दारूचे व्यसन लागले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि निधी तिच्या पतीपासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली. शंतनू हा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी निधी देशमुख ही देखील त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. या दोघांमध्ये प्रेम जुळलं. दरम्यान वर्षभरापूर्वी दोघांनी प्रेम विवाह केला. त्यानंतर ते आई वडिलांपासून दूर राहू लागले. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. शंतनू दारू पिऊन निधीला त्रास होत होता. शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपविण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने तिच्याकडे शिकवण्यासाठी येत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली.

पतीला संपवण्याच्या विचाराने तिने 13मे च्या रात्री तिच्या पतीला विष देऊन संपवलं. त्यानंतर त्याने मृतदेह रात्रभर घरातच ठेवला. ती दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय झाला. रात्री विद्यार्थ्यांच्या मदतीने शंतनूचा मृतदेह चौसाळा जंगलात नेण्यात आला आणि तिथे फेकण्यात आला. जेव्हा तिला भीती वाटू लागली की जर मृतदेहाची ओळख पटली तर तिच्या अडचणी वाढतील, तेव्हा ती पुन्हा जंगलात गेली आणि तिच्या पतीच्या शरीरावर पेट्रोल ओतून ते पेटवून दिले.

Chandrapur News l “चंद्रपूरची नोंद जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये; विदर्भात उष्णतेचा कहर”

Maharashtra Weather Update:  विदर्भात तापमानाचा  (Temperature) अक्षरक्ष: उद्रेक झाल्याचे बघायाल मिळत आहे. कारण विदर्भातील तापमानाचा पारा बघितला तर साऱ्यांना खरोखर ‘बापरे’ च म्हणण्याची वेळ सध्या सर्वसमान्यांवर आगे आहे. विदर्भात तापमानाचा पारा (IMD) रोज नवे उच्चांक गाठत असताना चंद्रपूर (Chandrapur) शहाराने राज्यात, देशात देशात नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण (Heat Wave) शहरांच्या यादीत पाहिले नाव कोरले आहे. सोमवारी(21 एप्रिल) चंद्रपूर शहराचा पारा 45.6 अंशावर पोहचला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच रविवारीही चंद्रपूर देशातले पहिले शहर ठरले होते. त्यानंतर पुन्हा त्यात तापमानाचा उद्रेक होऊन नवा  उच्चांक गाठला आहे. (Hottest City In The World)

सूर्य कोपला! ब्रह्मपुरी तिसरे, अमरावती पाचवे सर्वात हॉट

चंद्रपूर प्रमाणेच विदर्भातील इतर जिल्ह्यात अशीच काहीशी परिस्थिती असून ब्रह्मपुरी हे  तिसरे तर अमरावती पाचवे देशात अन् जगात सर्वात हॉट शहर ठरले आहे. दरम्यान पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी सूर्य आणखी  कोपणार असून हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांची चिंता अधिक वाढली असून संभाव्य धोका लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट

पुढील दोन दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तर व पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याचे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. वातावरण शुष्क (ड्राय) असल्यानेच उन्हाचा तडाखा अधिक जाणवतो आहे. सोमवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून हे तापमान सामान्यपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस (मंगळवार आणि बुधवार) विदर्भातील काही जिल्ह्यात हिट- वेव्ह चा इशारा नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

 दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळा 

मंगळवारी प्रामुख्याने चंद्रपूर, अमरावती, नागपूर आणि अकोल्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  तर बुधवारी या जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्हाची भर पडणार आहे. हवामान विभागाच्या मते ही परिस्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे. ज्याप्रमाणे दिवसा सामान्यपेक्षा जास्त नोंदवण्यात येत आहे, त्याचप्रमाणे रात्रीच्या तापमानात ही वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरकर नागरिकांनी दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार बंद

दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून गोंदिया जिल्ह्याचा पारा हा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अशातच गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 वाजेनंतर ट्रॅफिक कमी झाल्यास व उष्णता वाढल्यास सिग्नल बंद करण्यात येत आहेत व 4 वाजेच्या दरम्यान ऊन कमी होताच व ट्रॅफिक वाढल्यामुळे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येतात. यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नल सुरू असल्याने चौकामध्ये थांबावे लागत नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय.

Nagpur l “नागपूरमध्ये उष्णतेचा कहर: वाहतूक पोलिसांसाठी शीतकक्षांची व्यवस्था”

Nagpur: सध्या संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून, शहरात गेले काही दिवस तापमान सतत  44 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांनाही बसत आहे. सतत उन्हात उभं राहणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी नागपूर पोलीस रुग्णालयाने यंदा विशेष तयारी केली आहे. (Nagpur Temperature)

गेल्या आठवड्यात उष्माघातामुळे अनेक पोलिसांना त्रास झाल्याची नोंद असून, याच पार्श्वभूमीवर यंदा नागपूर पोलीस प्रशासन आणि पोलीस रुग्णालयाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांसाठी पोलीस रुग्णालयात शीतकक्ष (Cooling Chamber) उभारण्यात आले आहेत.

पोलीसांसाठी शीतकक्ष, उन्हाच्या काहिलीवर उपाययोजना

तसेच, पोलिसांना उन्हापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, यासाठी दररोज मार्गदर्शन करण्यात येत आहे.  विशेष म्हणजे, गेल्या वर्षी केवळ तीन महिन्यांच्या उन्हाळ्यात 695 पोलीस कर्मचारी आजारी पडले होते. त्यातील अनेकांना उष्माघात, डिहायड्रेशन, रक्तदाब वाढणे किंवा घसादुखी यांसारख्या त्रासांनी ग्रासले होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून, पोलिसांच्या आरोग्यासाठी वेळेवर आणि प्रभावी उपाययोजना राबवली जात आहेत. सध्या नागपूर सह संपूर्ण विदर्भात तापमान वाढलेला आहे. नागपुरात गेले अनेक दिवस तापमान सातत्याने चढे आहे.

या तीव्र तापमानाचा विपरीत परिणाम कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी रस्त्यावर असणाऱ्या वाहतूक सांभाळण्यासाठी चौकांवर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांवर होत आहे… पोलिसांची काळजी घेण्यासाठी नागपूर पोलिसांच्या पोलीस प्रशासनाने विशेष उपाय योजले आहे.. पोलीस रुग्णालयात विशेष शीत कक्षाची उभारणी तर करण्यात आलीच आहे.. सोबतच रोज पोलिसांना स्वतःची काळजी घेण्यासाठी च्या विशेष सूचना पोलीस रुग्णालयाकडून दिल्या जात आहेत…

वाढत्या तापमानावर नागपूर पोलिसांची शक्कल

सध्या वाढलेलं तापमान पाहता वाहन चालकांना खास करून दुचाकी स्वारांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली आहे… दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजे दरम्यान नागपूरातील 33 चौकांवरील सिग्नल  रेड ब्लिंकरवर ठेवण्यात येत आहे… त्यामुळे सिग्नल वर पोहोचल्यानंतर वाहन चालकांना काही सेकंद थांबून अवतीभवतीच्या ट्रॅफिकची स्थिती पुढे जाता येत आहे.. सिग्नलवर बराच वेळ थांबून राहिल्यामुळे दुचाकी स्वरांना उष्माघाताचा धोका बळावतो… वृद्ध महिला आणि लहान बालकांना जास्त त्रास होतो.. हे पाहून नागपूर पोलिसांनी दुपारी एक त्याच्यात 33 चौकांवरील सिग्नल रेड ब्लिंकरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे… तापमान यापेक्षा जास्त वाढल्यास रेड ब्लिंकर वरील सिग्नलची संख्याही वाढवली जाईल तसेच वेळेत बदल करून दुपारी 12 ते संध्याकाळी पाच अशी केली जाईल अशी माहिती नागपूरचे वाहतूक पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांनी दिली आहे…

“नागपूर दंगलप्रकरण: आरोपी हमीद इंजिनिअरला जामीन, मास्टरमाईंड फहिम खानच्या जामिनावर सुनावणी उद्या”

Nagpur:  नागपूर शहराच्या महाल परिसरात मार्च 17 रोजी दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद  इंजिनिअरला नागपूर सत्र न्यायालयाने जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनावर मुक्त करण्याचे हे आदेश देण्यात आले असून उद्या (22 एप्रिल) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात सोशल मीडियावर दंगल भडकवणारे व्हिडिओ टाकण्यामागे हमीद इंजिनिअरचा कट असल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी हमीद इंजिनिअरला अटक करण्यात आली होती. (Nagpur Riots)

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या फहिम खानच्या जामिनावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार असून सध्या फहीम खान न्यायालयीन कोठडीत आहे.

कोण आहे हमीद इंजिनिअर?

हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मिडिया मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा  आरोप त्याच्यावर आहे. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो. सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. हमीद इंजिनिअरने फहीम खानच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्या दिवशी हिंसाचार झाला त्या दिवशी हमीद लोकांमध्ये भीती निर्माण करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप आहे. ती विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाली.

एवढेच नाही तर या विधानांचा हवाला देऊन लोकांकडून देणग्याही मागितल्या गेल्या. आता नागपूर सत्र न्यायालयाने हमीद इंजिनिअरला जामीनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. हमीद इंजिनिअरची औरंगजेब समर्थक म्हणून ओळख आहे. नागपुरात ज्या दिवशी हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर वास्तव्यास होता असे समोर आल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली होती. 17 मार्चला महाल आणि हंसापुरी येथे मोठा हिंसाचार घडला.यादरम्यान समाजकंटकानी पोलिसांवर हल्ले, जाळपोळ आणि दगडफेक केली. यात अनेक नागरिक तसेच पोलिस कर्मचारी जखमी झाले. या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खान याला आधीच पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे.

विदर्भात उष्णतेचा कहर! चंद्रपूरात 44.6°C, नागपुरात सिग्नल बंदची विशेष योजना राबवली

Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी उष्णतेमुळे नागरिकांची पूर्ती दैना झाली आहे. एरवी शहरातील कायम वर्दळीचे वाटणारे रस्तेही आता दुपारच्या वेळी सुनसान भासत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागील 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम असल्याचे पाहायला मिळत आहे. आज देखील चंद्रपूरात विदर्भातील सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची (Temperature Today) नोंद झाली आहे. तर पुढील 3 दिवस नागपूर,चंद्रपुर अकोला, अमरावती आणि वर्ध्यात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) कायम असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

दरम्यान, राज्याची उपराजधनी नागपुरातही तापमानाने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच नागपूरच्या 33 चौकांवर दुपारी एक ते चार सिग्नल रेड ब्लिंकरवर वाहन चालकांना सिग्नल वर थांबायची गरज नाही. कारण उन्हापासून वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेत ही योजना राबवली आहे.

दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजे दरम्यान सिग्नल रेड ब्लिंकरवर

सध्या वाढलेलं तापमान पाहता वाहन चालकांना खास करून दुचाकी स्वारांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजे दरम्यान नागपूरातील 33 चौकांवरील सिग्नल  रेड ब्लिंकरवर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सिग्नल वर पोहोचल्यानंतर वाहन चालकांना काही सेकंद थांबून अवतीभवतीच्या ट्रॅफिकची स्थिती पाहून पुढे जाता येत आहे.

सिग्नलवर बराच वेळ थांबून राहिल्यामुळे दुचाकी स्वरांना उष्माघाताचा धोका बळावतो. त्यात वृद्ध महिला आणि लहान बालकांना जास्त त्रास होतो. हे पाहून नागपूर पोलिसांनी दुपारी एक त्याच्यात 33 चौकांवरील सिग्नल रेड ब्लिंकरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तापमान यापेक्षा जास्त वाढल्यास रेड ब्लिंकर वरील सिग्नलची संख्याही वाढवली जाईल, तसेच वेळेत बदल करून दुपारी 12 ते संध्याकाळी पाच अशी केली जाईल.  अशी माहिती नागपूरचे वाहतूक पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांनी दिली आहे.

विदर्भात 21 ते 23  एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता

दरम्यान, विदर्भात 21 ते 23  एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यात अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.  मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट राहणार असल्याचे ही सांगण्यात आलंय. तर संध्याकाळी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

कॉमेडियन सामय रैनाचे त्रास वाढले | टाइम रैनाने नेत्रदीपक नवजात मुलाची चेष्टा केली: मुलाला lakh 16 लाख इंजेक्शन आवश्यक आहे; सर्वोच्च न्यायालय रागावले, म्हणाले- आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत

इंडियाच्या गेट लॅटंट शोमध्ये, अश्लील सामग्रीच्या आरोपाखाली पकडलेल्या रैनाला आता रीढ़ की हड्डीच्या स्नायूंच्या rop ट्रोफी (एसएमए) ग्रस्त दृश्यमान नवजात मुलाची चेष्टा केल्याचा आरोप आहे.

त्याच्यावर भारताच्या एसएमए फाउंडेशनने आरोप केला आहे. फाउंडेशनने दहा महिन्यांपूर्वी कोर्टाला सांगितले की, रैनाने त्या विनोदी क्लबच्या स्टँडअपमध्ये म्हटले आहे- ‘लुक’ द चॅरिटी चांगली गोष्ट आहे, ती केली पाहिजे. मी एक चॅरिटी पहात होतो, ज्यात दोन -महिन्याचे बाळ आहे, जे काही वेडे झाले आहे. ज्याच्या उपचारासाठी त्याला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन आवश्यक आहे.

वेळात शोमध्ये बसलेल्या एका महिलेला प्रश्न विचारला, मला सांगा … जर तुम्ही ती आई असता तर तुमच्या बँकेत तुम्हाला १ crores कोटी मिळाले असते. एकदा, तिच्या नव husband ्याकडे पाहता ती बोलते की महागाई वाढत आहे, कारण त्या इंजेक्शननंतरही मूल टिकेल याची शाश्वती नाही. मरू शकता. इंजेक्शननंतर मरण पावला. त्यापेक्षा वाईट म्हणजे, 16 कोटींच्या इंजेक्शननंतर, मूल जिवंत राहिले, मग मोठे झाले आणि म्हणाले की मला एक शिकार व्हायचे आहे.

फाउंडेशनची याचिका सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अशा सामग्रीचे छळ करण्यासारखे वर्णन केले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले- आम्ही या आरोपांमुळे खरोखर नाराज आहोत, आम्ही अशी प्रकरणे नोंदवतो. संबंधित व्यक्तींचा समावेश करून आम्ही उपाययोजना सुचवू, मग आम्ही पाहू.

पाठीच्या स्नायूंच्या शोषात शरीर हळूहळू कमकुवत होते

रीढ़ की हड्डीचे स्नायू rop ट्रोफी म्हणजे एसएमए एक न्यूरो स्नायू डिसऑर्डर आहे. जेव्हा मुलामध्ये हा विकार होतो तेव्हा त्याचे शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते. शरीराचे बरेच भाग हलविण्यास सक्षम नाहीत कारण शरीराच्या स्नायूंवर त्यांचे नियंत्रण संपू लागते. हा एक अनुवांशिक रोग आहे जो जीन्स विचलित होतो तेव्हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो.

हे का होते ते समजूया. जेव्हा पाठीच्या स्नायूंच्या दृष्टीकोनातून मेंदूची मज्जातंतू विक्री आणि पाठीचा कणा खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत, मेंदूच्या स्नायूंना नियंत्रित करण्यासाठी संदेश पाठविणे हळूहळू थांबते. परिणामी, मूल हलविण्यात अक्षम आहे. हा रोग वाढत असताना, मूल स्वतःच हालचाल थांबवते.

आतापर्यंत कोणतेही अचूक उपचार प्राप्त झाले नाहीत, फक्त औषधांद्वारे त्याचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि, असा दावा केला जात आहे की झोलजेन्स्मा इंजेक्शनच्या डोसमुळे हा रोग बरे होऊ शकतो.

रीढ़ की हड्डीचे 5 प्रकार आहेत

  • प्रकार -0: जेव्हा मूल पोटात असते तेव्हा असे घडते. मुलाला जन्मापासूनच संयुक्त वेदना होते. तथापि, अशा प्रकरणे जगात क्वचितच नोंदविली जातात.
  • प्रकार -1: जेव्हा हे घडते तेव्हा कोणाच्याही मदतीने मुलाला डोके हलविण्यास सक्षम नसते. हात व पाय सैल आहेत. काहीही गिळण्यातही अडचण आहे. तिरा यासह संघर्ष करीत आहे.
  • प्रकार -2: त्याची प्रकरणे 6 ते 18 महिन्यांच्या मुलामध्ये दिसतात. पायांवर हात अधिक प्रभाव दिसून येतो. परिणामी, ते उभे राहण्यास अक्षम आहेत.
  • प्रकार -3: 2-17 वर्षांच्या जुन्या लोकांमध्ये लक्षणे दिसतात. टाइप -1 आणि 2 च्या तुलनेत रोगाचा परिणाम कमी दृश्यमान आहे, परंतु भविष्यात व्हीलचेअर्स आवश्यक असू शकतात.
  • प्रकार -4: या प्रकारचे रीढ़ की हड्डी स्नायूंचा rop ट्रोफी प्रौढांमध्ये दिसून येतो. स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेण्यास अडचण येते. हात व पायांवर परिणाम.

स्वित्झर्लंड कंपनी इंजेक्शन बनवते

झोलजेन्स्मा स्वित्झर्लंड कंपनीत नोव्हार्टिस इंजेक्शन्स तयार करते. कंपनीचा असा दावा आहे की हे इंजेक्शन हा एक प्रकारचा जनुक थेरपी उपचार आहे. जे एकदा लागू होते. हे रीढ़ की हड्डीच्या स्नायूंच्या rop ट्रोफीशी झगडत असलेल्या 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लागू होते.

हे इंजेक्शन इतके महाग का आहे यावर, नोव्हार्टिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंहन म्हणतात, जीन थेरपी ही वैद्यकीय जगातील एक मोठी शोध आहे. जे लोकांमध्ये आशा जागृत करते की डोसपासून पिढ्यान्पिढ्या पोहोचणार्‍या प्राणघातक अनुवांशिक रोग बरे होऊ शकतो.

इंजेक्शनच्या तिसर्‍या टप्प्याचा आढावा घेतल्यानंतर, क्लिनिकल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूटने त्याची किंमत 9 ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान निश्चित केली. हे गृहित धरुन नोव्हार्टिसने 16 कोटी रुपयांची किंमत ठेवली.

शोमधील पालक-महिलांवर अश्लील टिप्पण्यांचे प्रकरण

स्टँड-अप कॉमेडियन टाइम रैनाच्या शो ‘इंडिया गॉट लप्त’ या कार्यक्रमात वाद सुरू आहे. टाइमने 8 फेब्रुवारी रोजी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शोचा एक भाग अपलोड केला. ज्यामध्ये YouTuber रणवीर अलाहाबादियाने पालक आणि स्त्रियांबद्दल अश्लील गोष्टी म्हटले होते. दैनिक भास्कर या गोष्टींचा उल्लेख करू शकत नाहीत.

शोच्या सर्व पाहुण्यांविरूद्ध एक प्रकरण दाखल केले गेले

हा भाग दिसू लागताच शो आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर कठोर टीका होऊ लागली. आसामच्या महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी रणवीरला एफआयआर दाखल करण्यात आला. पहिल्या भागापासून आतापर्यंत शोमध्ये भाग घेणा the ्या शोच्या 30 अतिथींविरूद्ध वेळ व्यतिरिक्त एक प्रकरण नोंदविण्यात आले.

वाढत्या वादामुळे सर्व भाग साफ, हटविले

वाद आणि तक्रार दाखल झाल्यानंतर रैनाने सोशल मीडियावर लिहिले-

कोटिमेज

जे काही घडत आहे, मी ते हाताळण्यास सक्षम नाही. मी माझ्या चॅनेलवरून भारताच्या गेट लॅटंटचे सर्व व्हिडिओ काढले आहेत. माझे ध्येय फक्त लोकांना हसणे आणि आनंद देणे हे होते. मी सर्व एजन्सींसह पूर्णपणे सहकार्य करेन जेणेकरून त्यांची योग्य तपासणी केली जाऊ शकेल. धन्यवाद.

कोटिमेज

शोच्या प्रत्येक भागावर सरासरी 20 दशलक्षाहून अधिक दृश्ये येत असत.

त्यावेळी, रैनाच्या या शोच्या प्रत्येक भागामध्ये यूट्यूबवर 20 दशलक्षाहून अधिक दृश्ये मिळाली. वेळ आणि बलराज घाई वगळता न्यायाधीश शोच्या प्रत्येक भागात बदलत असत. प्रत्येक भागामध्ये, नवीन स्पर्धकांना सादर करण्याची संधी मिळायची. स्पर्धकांना त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी 90 सेकंद देण्यात आले. आता या शोचे सर्व व्हिडिओ काढले गेले आहेत.

“एक Kiss देशील का?”; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लोकल ट्रेनमध्ये घडली धक्कादायक घटना

मुली आणि महिलांच्या विनयभंगाच्या अनेक घटना आपण दररोज ऐकत असतो. याला सेलिब्रिटी किंवा अभिनेत्रीसुद्धा अपवाद ठरत नाहीत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली असता गर्दीतल्या एका व्यक्तीने तिचा हात खेचला होता. या घटनेनंतर आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान अभिनेत्रीसोबत ही घटना घडली होती. या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली होती.

दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम करणारी अभिनेत्री मालविका मोहननने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “लोक अनेकदा म्हणतात की मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित आहे. पण या दृष्टीकोनाबद्दल मला जरा बोलायचं आहे. आज माझी स्वत:ची गाडी आणि ड्रायव्हर आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती मला विचारत असेल की मुंबई सुरक्षित आहे का, तर माझं उत्तर कदाचित हो असेल. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होती आणि ट्रेन किंवा बसने प्रवास करत होती, तेव्हा मला अजिबात सुरक्षित वाटलं नव्हतं.”

हे सुद्धा वाचा

“ती घटना मला आजही नीट लक्षात आहे. मी माझ्या दोन मैत्रिणींसोबत लोकल ट्रेनने प्रवास करत होती. तेव्हा कदाचित रात्रीचे 9.30 वाजले होते. आम्ही फर्स्ट क्लासने प्रवास करत होतो आणि त्यावेळी डब्बा तसा रिकामाच होता. आमच्या तिघींशिवाय कम्पार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं. मी खिडकीजवळ बसले होते. तेव्हा अचानक एक माणूस आम्हा तिघींना बघून खिडकीच्या ग्रिलजवळ आला. त्याने त्याचा चेहरा ग्रिलजवळ आणून म्हणाला, एक चुम्मा देगी क्या? (एक किस देशील का?) आम्ही तिघी स्तब्ध झालो होतो. अशा परिस्थितीत कसं वागायचं हे त्या वयात समजतही नाही. जर तो आमच्या डब्ब्यात चढला असता तर काय झालं असतं? आपण सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही महिलेला विचारलं तरी ती असंख्य अशा घटना सांगेल. कोणतीच जागा पूर्णपणे सुरक्षित वाटत नाही”, असं ती पुढे म्हणाली.

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात: भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप; सडकछाप म्हणत काँग्रेसचा जोरदार पलटवार

मुंबईवरील 26/11 च्या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते माधव भंडारी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसने माधव भंडारी एक सडकछा

माधव भंडारी यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या व मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केला. मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. मुंबईवर हल्ला होणार याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणे अशक्य आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश व एम एम कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्त्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले.

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. पण या प्रकरणी ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी म्हणाले.

गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न

माधव भंडारी यांनी यावेळी गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. भारतात गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाल्यानंतर व्यवस्थेमुळे हिंदुत्त्ववादी संघटनांना बदनाम केले जात आहे. कारण, व्यवस्था म्हणजे पोलिस, महसूल, न्यायव्यवस्था तीच आहे. ही व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

माधव भंडारींच्या अकलेचे दिवाळे निघाले – वडेट्टीवार

दुसरीकडे, माधव भंडारी यांच्या या आरोपामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी भंडारी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. रस्त्यावरच्या एखाद्या सडकछाप व्यक्तीने करावेत असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कोणता पुरावा आहे. एखाद्या राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, असे ते म्हणाले.

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

. डिफरन डिव्हंड्रा फड्नाविस (टी) डेपोचे मुख्य मंत्री