back to top
Wednesday, March 11, 2026
10.4 C
London
Home Blog Page 522

‘लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप’, सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट l Sudhir Mungantiwar

सुधीर मुंगतीवार: ‘लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप करण्यात आला त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती देण्यात आली,’ असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केलाय.

सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

2014 ते 2019 आणि 2022 ते 2024 पर्यंत सुधीर मुनगंटीवार हे मंत्री होते. मात्र, 2024 निवडणुकीनंतर त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी  ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’  कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे.

‘मंत्रिपद का नाकारलं याबाबत मला अशी माहिती देण्यात आली की, लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे. स्वत:हून कोण पराभूत होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, मला लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीर पणे सांगितले पण पराभूत व्हायचं हे कस होईल,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

'लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप', सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘लोकसभेत एकटाच पराभूत झालो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार पराभूत झालेत. तेव्हा वातावरणच तसं होतं. संविधानाच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात जे नरेटिव्ह सेट केले त्यामुळं आम्ही पराभूत झालो. उमेदवार म्हणून लढायचं नव्हतं पण उमेदवार झाल्यानंतर तर मी इतक्या कडक उन्हात फिरलो. पण मी पूर्वतयारी करु शकलो नाही. दिवस कमी होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘मंत्रिपद ज्याने कोणी काढलं असेल किंवा मला मंत्रिपद देऊ नये असं सांगितलं असेल. तर त्यावर उत्तर काय. उत्तम काम करणे. मी माझ्या जिल्ह्यात मिशन ‘ऑलिंपिक 36′ वर काम करतो. माझा उद्देश काय तर ऑलिंपिकमध्ये माझ्या जिल्ह्याचा कोणीतरी मेडल प्राप्त करेल. मी आता या ठिकाणी माझ्या जिल्ह्याच उत्तम उत्तम काम करेन. पंतप्रधानांच्या हस्ते माझ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकारमध्ये 10 विषयांत नंबर एक आहोत. अजूनही खूप काम करायचंय,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

मंत्रिपद गेल्याची खंत आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, ‘मी जेव्हा माझ्या नातींना मांडीवर घेतो तेव्हा सर्वात जास्त आनंद असतो. मंत्रीपद जाणे येणे हे होतंच आणि कोण पर्मनंट आहे. मंत्रीपद गेल्याची अजिबात खंत नाही,’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये चालंलय काय? शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का; ‘त्या’ पोस्टने खळबळ

बीडमध्ये चालंलय काय? शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का; ‘त्या’ पोस्टने खळबळ

 

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बीडमधील एका आश्रमशाळेतील शिक्षकाने फेसबूक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. गेल्या १८ वर्षांपासून वेतन न मिळाल्याने आश्रमशाळेतील शिक्षकाने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव धनंजय नागरगोजे असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आश्रमशाळेत वेतन मागितल्यावर गळफास घे, असं उत्तर दिल्याचा उल्लेख धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तर आश्रमशाळेचे संस्थाचालक विक्रम मुंडे असल्याचा उल्लेखही धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूक पोस्टमध्ये पाहायला मिळतोय. तर बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली आहे. धनंजय नागरगोजे यांनी कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच मध्यरात्री गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nitin Gadkari : निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण.. ; गडकरींचा जातीयवादावर टोला…

जो करेगा जात की बात उसको कस के मारुंगा लाथ, असं वक्तव्य मी 50 हजार लोकांमध्ये केलं होतं असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना म्हंटलं आहे. त्यावर मला मित्र म्हणाला होता की असं बोलून तू स्वत:चं नुकसान करून घेतलं आहे.

मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीयवादाच्या मुद्द्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मला अनेक जातीचे लोक भेटायला येतात. एका कार्यक्रमात मी 50 हजार लोकांसमोर ‘जो करेगा जात की बात उसको कस के मारुंगा लाथ’ असं विधान केलं होतं. त्यावर मला माझ्या मित्रांनी मी असं बोलून चूक केली असल्याचं देखील म्हंटलं होतं. पण मी त्यांना म्हटलं यामुळे मी निवडणूक हरलो, किंवा माझं मंत्रिपद गेलं तरी मला फरक पडत नाही. तरीही मी माझ्या या तत्वावर ठाम राहील, असं यावेळी गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसने जातीयवाद वाढवला, आम्ही कधीच जातीचा उल्लेख केला नसल्याचं म्हंटलं आहे. प्रत्येक भारतीय आमचा बांधव असल्याची आमची भूमिका असल्याचं देखील यावेळी शिरसाट म्हणाले आहेत.

पाकिस्तान हादरलं! पाक सैन्यावर सर्वात मोठा हल्ला, BLAच्या हल्ल्यात 90 सैनिक ठार

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. यावेळी बलुच दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्याने हा हल्ला भारतातील पुलवामा हल्ल्यासारखाच असल्याचे दिसत आहे. बलुचिस्तानमधील नोश्की येथे सुरक्षा दलाच्या सात बस आणि दोन गाड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 5 सैनिकांचा मृत्यू झाला असून 13 सैनिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती देताना बीएलएने दावा केला आहे की, या हल्ल्यात सुमारे 90 जवान शहीद झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “एक बसला व्हीकल बॉर्न आयईडीने लक्ष्य केले होते. हा आत्मघातकी हल्ला होता. तर दुसरी बस क्वेटा ते तफ्तानला जात असताना रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने लक्ष्य करण्यात आली होती.” हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना नोश्की आणि एफसी कॅम्पमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती नोश्कीचे एसएचओ सुमलानी यांनी व्यक्त केली.

https://twitter.com/hashtag/BREAKING?src=hash&ref_src=twsrc%5Etfw

बलुच लिबरेशन आर्मीचे विधान

हल्ल्यानंतर, बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले गेले आहे की, बलुच लिबरेशन आर्मी (BLA)च्या आत्मघाती युनिट मजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोश्की येथील आरसीडी महामार्गावरील राखशान मिलजवळ व्हीबीआयईडी आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर लक्ष्य केले. ताफ्यात आठ बस होत्या, त्यापैकी एक स्फोटात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हल्ल्यानंतर लगेचच, बीएलएचे फतेह पथक पुढे सरकले आणि दुसऱ्या बसला पूर्णपणे वेढा घातला. त्या बसमधून प्रवास करणाऱ्या जवानांना ठार मारले. त्यामुळे मृतांची संख्या ९०वर पोहोचली आहे.

Nagpur News | गडकरी म्हणाले- जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात: मंत्रीपद मिळाले नाही तर मरणार नाही, मात्र माझ्या तत्वांवर ठाम राहीन

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले, ‘जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात.’

एका अल्पसंख्याक संस्थेच्या दीक्षांत समारंभात गडकरी म्हणाले, ‘मी सार्वजनिक ठिकाणी धर्म आणि जातीबद्दल बोलत नाही. समाजसेवा प्रथम येते. मी निवडणूक हरलो किंवा माझे मंत्रीपद गमावले तरी मी या तत्वावर ठाम राहीन. जर मला मंत्रीपद मिळाले नाही तर मी मरणार नाही.

गडकरींच्या भाषणातील ३ गोष्टी

१. भेदभाव करत नाही

गडकरी म्हणाले की, आम्ही कधीही जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. मी राजकारणात आहे आणि इथे अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. पण मी माझ्या पद्धतीने गोष्टी करायचे ठरवले आहे. मला कोण मतदान करेल याची मला चिंता नाही.

ते म्हणाले की माझ्या मित्रांनी सांगितले की सार्वजनिक जीवनात असताना तुम्ही हे बोलायला नको होते. पण मी आयुष्यात हे तत्व पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तरी मी मरणार नाही.

२. जर एखादा मुस्लिम आयपीएस किंवा आयएएस झाला तर सर्वांची प्रगती होईल

गडकरी म्हणाले की, ते एमएलसी असताना त्यांनी एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची परवानगी अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) ला हस्तांतरित केली होती. मुस्लिम समुदायाला त्याची जास्त गरज आहे असे त्यांना वाटले. ते म्हणाले की जर मुस्लिम समुदायातून अधिक अभियंते, आयपीएस आणि आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल.

३. शिक्षण जीवन बदलू शकते

गडकरी म्हणाले, “आपल्याकडे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आहे. आज हजारो विद्यार्थी अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली अभियंते बनले आहेत. जर त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसती तर काहीही झाले नसते. ही शिक्षणाची शक्ती आहे. ते जीवन आणि समुदाय बदलू शकते.”

.

नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या राऊतांकडून मंत्री उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक

 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेत असताना संजय राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उदय सामंत यांचे कौतूक करत त्यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “मी उदय सामंत यांच्या अभिनंदन करतो. त्यांनी राजापूर मध्ये संयमाची भूमिका घेऊन, दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला”. पुढे ते असेही म्हणाले, कोकणात अशा दंगली कधी घडवल्या नव्हत्या. हे कालचे आलेले हिंदुत्वाच्या नावावर आणि दंगली घडवत आहेत. कोकणात हिंदू मुसलमान यांच्या नावावर, कोकणाची राख रांगोळी करायची आहे का? मी आज वाचलं उदय सामंत यांनी संयमाची भूमिका घेतली, राजापूर आणि रत्नागिरी भागात आणि त्यांनी दोन्ही समाजामध्ये जो तेढ काही लोकांनी निर्माण केला होता तो नष्ट केला, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

ट्रेनच्या अपहरणानंतर, बलुचिस्तानमधील पाकिस्तान सैन्याच्या 8 बसेसने हल्ला केला!

पाकिस्तानी सैन्याच्या काफिलावर हल्ला: पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या अपहरणानंतर घाबरुन गेले आहे. दरम्यान, रविवारी (१ March मार्च) बलुचिस्तानमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) दावा केला आहे की त्यात 90 ० पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

बलुचिस्तान पोस्टनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या काफिलावर नोशिकी येथे हल्ला करण्यात आला. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीडी महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. तेथे बरेच स्फोट आणि नंतर जोरदार गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर, अनेक रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल त्या जागेच्या दिशेने जाताना दिसल्या, तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात घोषित करण्यात आले आहे.

पाकिस्तान सैन्याची 8 वाहने लक्ष्यित: बीएलए

पाकिस्तान आर्मीच्या काफिलावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेत बीएलएचे प्रवक्ते जिआंड बलुच म्हणाले, ‘बीएलए युनिट या माजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोशिकीच्या आरसीडी महामार्गावरील रसाखान गिरणीजवळील पाकिस्तानी सैन्याच्या काफिलाला लक्ष्य केले. या काफिलामध्ये आठ बसेस होते, त्यातील एक पूर्णपणे नष्ट झाला होता.

आम्ही पाक सैन्याच्या 90 सैनिकांना मारले: बीएलए

या हल्ल्यात पाकिस्तान सैन्याच्या 90 सैनिकांचा मृत्यू झाला असा बीएलएने दावा केला होता. संघटनेने सांगितले की, हल्ल्यानंतर लगेचच बीएलए पथक पुढे गेला आणि बसला वेढले आणि त्यातील सर्व सैनिकांवर हल्ला केला आणि त्यांना ठार मारले.

‘संतोष देशमुख हत्येची बीडमध्ये पुनरावृत्ती, सरकार काय करतंय?’ दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन् हातच जोडले

‘अजित पवार कसले पालकमंत्री, ते फक्त बीडला गेले. नुसती पदं भूषवायची पण काम काही करायचं नाही’, असं वक्तव्य करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला. यावेळी त्यांनी बीडमध्ये चाललंय तरी काय? असा संतापजनक सवालही यावेळी थेट सरकारला केला. बीडच्या आष्टी तालुक्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याची माहिती देत अत्यंत धक्कादायक असल्याचे दमानिया म्हणाल्या. या घटनांवर काय बोलावं आता शब्दच सुचत नाहीत. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं, तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा होऊ लढावा. तर आता हे सगळ्या हाताबाहेर गेलेले आहे. सगळे अधिकारी सिस्टिम बदलून टाका. काही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे तिथे ती आता बदला, अशी मागणी हात जोडून दमानिया यांनी सरकारकडे केली.

राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाच्या सरी..!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

कसं असेल तापमान?

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर एका दिवसानंतर, IMD ने उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती हळूहळू कमी होऊन तापमान हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवला.

15 मार्च रोजी मुंबई शहराचे पहिले 40 अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड (नवी मुंबई) आणि रत्नागिरीला इशारा जारी केला. “गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान कमी होत आहे आणि राज्याच्या काही भागात दमट आणि कोरडे वातावरण दिसून येईल,” असे IMD चे संचालक सुनील कांबळे म्हणाले.

विदर्भात तीन जिल्ह्यांसाठी High Alert

हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिलाय. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमान इशारा देण्यात आलाय. गेल्या तीन दिवसात चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळीं घेतली आहे. होळी नंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडी जाणवत होती. मात्र त्यानंतर अचानक पारा उंचावला आणि आता मागील 10 दिवसांच्या सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद विदर्भातील सर्वच जिल्ह्यात झाली आहे. मार्चच्या मध्यात तापमान 42 अंश सेल्सियसपर्यंत धडकल्याने आगामी काळात पारा चढा राहील असा अंदाज वर्तविला जात आहे


. वाईब्स (टी) मुंबई (टी) महाराष्ट्र (टी) कोकण (टी) विदर्भा (टी) मराठवाडा (टी) महाराष्ट्र हवामान अद्यतने (टी) महाराष्ट्र हवामानातील ताज्या बातम्या (टी) हवामानातील हवामान (टी) हवामान अद्ययावत (टी) हवामान अद्यतने अद्यतने (टी) हवामान बातम्या (टी) आजचा हवामान अहवाल (टी) मॉन्सून (टी) आयएमडी (टी) मुंबई पाऊस (टी) पाऊस (टी) महाराष्ट्र (टी) महाराष्ट्र हवामानाचा अंदाज (टी) मुंबई हवामान बातमी (टी) मुंबई बातम्या (टी) बातमी (टी) बातमी (टी) बातमी (टी) (टी) Samalaisa मह आजचे आजचे आजचे आजचे आजचे आजचे

बीडमध्ये तरुणाचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू: संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती म्हणत अंजली दमानिय आक्रमक, सरकारवर केली टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. एका ट्रक चालकाला कुटुंबातील लोकांनी दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घड

अंजली दमानिया म्हणाल्या, विलास बनसोडे नावाचा 23-24 वर्षाचा मुलगा हा क्षीरसागर कुटुंबाकडे चार वर्षांपासून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याला मारहाण करून त्याचा मृतदेह रुग्णालयात टाकून ती माणसे गायब झाली. त्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरच्यांना कळवण्यात आले. त्याचे फोटो बघून पुन्हा हादरून निघालो आहोत. जसे संतोष देशमुखांचे फोटो होते, अगदी तसेच चित्र समोर आले आहे. हे सगळे बघून काय बोलावे तेच कळत नसल्याचे दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली. काल एका शिक्षकाने स्वतःला बँकेसमोर गळफास लावून घेत आपले जीवन संपवले. संस्था चालकाकडे पगार मागितला म्हणून त्याने शिक्षकाला सांगितले “तू फाशी घे. म्हणजे तूही मोकळा आणि आम्हीही मोकळे.” सरकार काय करत आहे? सरकार काही पाऊले का उचलत नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. त्या शिक्षकाची तीन वर्षांची मुलगी आणि त्याचे वयोवृद्ध आई-वडील आहेत, त्यांचे पुढे काय? 6 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात त्या शिक्षकाने आझाद मैदानावर आंदोलन केले. काय मिळाले त्यातून? शेवटी त्याला प्राण द्यावे लागले, असे दमानिया म्हणाल्या.

अजित पवार कसले पालकमंत्री?

सरकार आणि विरोधी पक्ष यावर चर्चा का करत नाहीत? कबर, झटका, हलाल हे काय चाललंय? इकडे लोक मरत आहेत, आणि तुम्ही नाटके करत आहात, अशा शब्दांत दमानिया यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे. अजित पवार कसले पालकमंत्री? ते फक्त एकदाज बीडला येऊन गेले. त्यानंतर त्यांच्याकडून एक चकार शब्द ऐकलेला नाही. जे मेले त्यांची नावे अजित पवारांना माहिती सुद्धा नाहीत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

पवारांनी मुंडेंना तिथल्या तिथे धडा शिकवायला हवा होता

अंजली दमानिया म्हणाल्या, शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातले, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या. का तुम्ही त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या होत्या? धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळे घडताना दिसले नसते. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केले, त्यांनी काय शिकवले. आत्ता देखील मला जे तिसरा प्रकरण कळले आहे, शिवसेना उबाठा गटाचे काय कारवाई करतील. ज्याप्रमाणे शिंदे गटातील व्यक्तींना मी सांगून तो बोर्ड उतरवला आणि त्यांचे घर त्यांना परत मिळवून दिले, जर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळे बंद होईल. सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल, हे थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे असे म्हणत अंजली दमानिया आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले.

बीडमधील सर्व पोलिस स्टाफ नव्याने आणण्याची गरज

आता या सर्व प्रकरणांमध्ये कोणाची भेट घेण्यात मला काहीच वाटत नाही. सगळ्यांची भेट घेऊन देखील तीन महिने कोणीच काही कारवाई केली नाही. आता मी कोणाचीही भेट घेणार नाही. मला फक्त वाटते की, हे सगळे थांबले पाहिजे. गृहमंत्र्यांनी हे सगळे थांबवले पाहिजे आणि पहिले तर पूर्ण बीड पोलिस विभाग आहे त्याला बीड जिल्ह्याच्या बाहेर टाकून सर्व पोलिस स्टाफ नव्याने आणण्याची गरज आहे आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज

बीड पोलिसांनी आपल्या नेमप्लेटवरती फक्त आपले नाव लावायचे आडनाव लावायचे नाही यावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, तिथे सगळ्यांना सगळ्यांची जात माहिती आहे. आता आपण या सर्वांत जातीपातीत नको पडूया. आत्तापर्यंत जी जी प्रकरणे समोर आली ती सर्व जातीच्या लोकांचे आहेत. सगळ्या जातीतल्या लोकांनी सगळ्या जातीच्या लोकांना मारले आहे. त्यामुळे तिथे जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.