back to top
Sunday, September 14, 2025
10 C
London
Home Blog Page 8

पंजाब सलग दुसर्‍या विजयासाठी सज्ज, लखनौ रोखणार का?

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 13 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने असणार आहेत. लखनौचा हा या मोसमातील तिसरा तर पंजाबचा दुसरा सामना असणार आहे. पंजाबने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात या हंगामात विजयी सुरुवात केली. तर लखनौ विजयी सलामी देण्यात अपयशी ठरली. मात्र लखनौने दुसर्‍या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट्सने मात करत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे लखनौचा ही विजयी वाटचाल अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पंजाब सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात आता कोणता संघ यशस्वी ठरतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मंगळवारी 1 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे आयोजित करण्यात आला आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

लखनऊ सुपर जायंट्स असोसिएशन: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

पंजाब किंग्ज टीम: जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.

Ghibli स्टाईलमध्ये दिसले PM Modi; दाखवला ‘न्यू इंडिया’चा संपूर्ण प्रवास

अचानक घिबली स्टाईलचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे, प्रत्येकजण एआयच्या मदतीने स्वत:चे घिबली स्टाईलचे फोटो बनवत आहे आणि शेअर करत आहे. केवळ सेलिब्रिटीच नाही तर आता पंतप्रधान मोदीही या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. पंतप्रधान मोदींचे एक नाही तर अनेक घिबली स्टाईल फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच हे सर्व फोटो गेल्या काही वर्षांत घडलेल्या महत्त्वाच्या घटनांपासून प्रेरित आहेत आणि या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रसंगी दाखवले आहेत. चला जाणून घेऊया तुम्ही तुमचा स्वतःचा घिबली स्टाईल म्हणजे काय? तसेच या घिबली स्टाईलने फोटो कसा तयार करू शकता?

घिबली स्टाईल म्हणजे काय?

सगळेजण ‘घिबली-घिबली’ म्हणत आहेत पण तुम्हाला माहित आहे का घिबली म्हणजे काय? मीडिया रिपोर्ट्सनुसार, घिबली ही स्टाईल जपानी ॲनिमेशन फिल्म स्टुडिओ घिबली (studio Ghibli)च्या कला शैली आणि कार्टूनपासून प्रेरित आहे, जो त्याच्या रंगीत आणि जादुई डिझाइनसाठी खूप प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा वाचा

घिबली स्टाईलचे पंतप्रधान मोदींचे फोटो पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे घिबली स्टाईलचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम किंवा एक्स (ट्विटर) अकाउंटऐवजी MyGovIndia च्या एक्स अकाउंटवरून शेअर केले गेले आहेत. फोटो शेअर करताना, ते मुख्य पात्र नसून संपूर्ण कथेचे प्रतिनिधित्व करत आहेत. स्टुडिओ घिबली स्ट्रोकद्वारे नवीन भारताचा अनुभव दाखवत आहेत.

पंतप्रधान मोदींचे घिबली स्टाईलचे फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहेत आणि लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. घिबली स्टाईलच्या या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदींच्या हातात तिरंगा धरलेला आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत.

घिबली स्टाईलच्या एका फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सैनिकांची मिलिट्रीची वर्दी परिधान केलेले दिसत आहेत. असे एक नाही तर अनेक फोटो आहेत. आता तुम्हाला तुम्हाला हे सर्व फोटो पाहून प्रश्न पडला असेल की हे घिबली स्टाईल टूल कोणी आणले आहे आणि तुम्ही तुमच्या फोटोला घिबली इफेक्ट कसा देऊ शकता? चला ते ही आपण जाणून घेऊयात

घिबली स्टाईल टूल कोणी बनवले?

एआय चॅटबॉट चॅटजीपीटी 4o मध्ये लोकांसाठी घिबली स्टाईल इमेज फीचर समाविष्ट केले आहे, या फीचरने लोकांना काही वेळातच वेड लावले आहे. सध्या हे फिचर्स ChatGPT Plus, Pro, Team सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, एआय जनरेटेड इमेजेसना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, सध्या हे फीचर मोफत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की हे एआय फीचर लवकरच मोफत वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाऊ शकते.

चॅटजीपीटी सबस्क्रिप्शन किंमत

चॅटजीपीटी प्लस सबस्क्राइब करण्यासाठी, तुम्हाला दरमहा 20 डॉलर म्हणजे आपल्या भारतीय चलनानुसार सुमारे 1711 रुपये खर्च करावे लागतील आणि प्रो सबस्क्रिप्शनसाठी, तुम्हाला दरमहा $200 डॉलर म्हणजेच सुमारे 17111 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हालाही घिबली स्टाईलचे फोटो काढायचे असतील तर तुम्हाला किमान 1711 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल.

“शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक: बच्चू कडूंचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा”

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी आमदारांच्या घरांसमोर टेम्भे पेटवून आंदोलन

बारामती मधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे एका कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत कर्ज भरण्याचे आवाहन केले होते. इतकेच नाही तर याच वर्षी काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी थेटच सांगितले. यामुळे महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आह. अशाातच आता बच्चू कडू हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आज गुढीपाडवा दिवशी सरकारला दिला आहे.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू?

आज गुढीपाडव्यानिमित्त बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच सरकारने निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाचे आश्वासन दिले होते, त्यासंदर्भात एक मोठे आंदोलन उभे करणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरासमोर रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा घेऊन टेम्भे मशाल पेटवण्याचे आंदोलन करणार आहोत. निवडणुकीच्या वेळी सरकारने जे आश्वासन दिले होते, त्याची दखल घ्यावी किंवा टेम्भेच्या मशालीने आम्हाला पेटवून द्या, असे निर्देश सरकारला देणार आहोत. दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता हे आंदोलन करणार आहोत.

‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी

दरम्यान, दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देखील आज गुढी पाडव्यादिवशी अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानाचा कोल्हापूर येथे निषेध केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची आश्वासन दिले होते. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सदर शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले, अशी टीका स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली.

 

“पालघरमध्ये भीषण अपघात: रॉकेल टँकर उड्डाणपुलावरून कोसळून लागली आग”

रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना पाल्गरच्या मॅनोर भागात मसान नाकाजवळ घडली.

रॉकेलने भरलेला एक टँकर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून खाली पडला. यामुळे ट्रकमध्ये आग लागली. रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना पाल्गरच्या मॅनोर भागात मसान नाकाजवळ घडली.

अपघातानंतर, रस्त्यावर अनागोंदी होती आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी फिरू लागले. ही संपूर्ण घटना जवळच्या कॅमेर्‍यामध्ये पकडली गेली. ही घटना मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेड टीम लगेचच घटनास्थळी पोहोचली.

घटनेनंतर टँकरला आग लागली.

घटनेनंतर टँकरला आग लागली.

टँकर वीस फूट उंचीवरून खाली पडला

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरने टँकरवर नियंत्रण गमावले, ज्यामुळे टँकर अनियंत्रित टँकरच्या उड्डाणपुलाच्या काठावर धडक बसला आणि थेट वीस फूट उंचीवरून थेट पुलाखालून सर्व्हिस रोडवर पडला आणि टँकरला त्वरित आग लागली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 2 तास बंद झाला

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना अपघाताविषयी त्वरित माहिती दिली. त्यानंतर अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे महामार्ग 2 तास बंद राहिला. यानंतर महामार्ग पुन्हा उघडला.

प्रशासनाचे म्हणणे आहे की सध्या अपघाताची चौकशी चालू आहे. टँकर ड्रायव्हरने नियंत्रण कसे गमावले आणि आग कशी सुरू झाली हे निश्चित केले जात आहे. लवकरच संपूर्ण अहवाल उघड होईल.

————————–

रस्ता अपघाताशी संबंधित ही बातमी वाचा …

मथुरा येथील आग्रा-दिल्ली महामार्गावर दोन ट्रक संघर्ष झाले, ड्रायव्हरची स्थिती गंभीर

मथुरा येथील आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील जय गुरुदेव मंदिराजवळ पहाटे पहाटे दोन ट्रक धडकले. कोलकाता ते दिल्लीला जाणा Chealic ्या केमिकल -लेडेन ट्रकला मागून दुसर्‍या ट्रकने धडक दिली. टक्कर इतकी प्रचंड होती की ट्रक विभाजकावर चढला. अपघातात ट्रक उडून गेला. कॅन्टरमध्ये भरलेले रासायनिक रस्त्यावर तुटलेले होते. ड्रायव्हरला गंभीर जखमी झाले. 

“लातूरमध्ये भरदिवसा गळा चिरून खून: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल”

लातूर : लातूर तालुक्यातील मुरुड शेजारील करकट्टा या गावी एका ४० वर्षीय तरुणाचा भर दिवसा गळा चिरून खून करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध आरोपीच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली शरद इंगळे वय ३९ यांनी मुरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच आरोपीने आपले पती शरद प्रल्हाद इंगळे यांचा रविवारी करकट्टा येथील खडी केंद्रावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला आहे, या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.

करकट्टा येथील मुकादम म्हणून काम करणारे शरद प्रल्हाद इंगळे हे गावालगत असलेल्या खडी केंद्रावर गुढीपाडव्याचा दिवस असला तरी रविवारी कामाला गेले होते .या ठिकाणी जाऊन शरद इंगळे यांच्यावर कोयत्याने आरोपीने हल्ला केला व त्याचा गळा चिरून आरोपी पसार झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर एकाने ही पाहिली असल्याचेही समोर आले आहे. ही घटना इतकी भयंकर होती की जागीच शरद इंगळे चा मृत्यू झाला. नातेवाईक संतप्त झाले होते तीन तास घटनास्थळीच प्रेत पडलेले होते .त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी नेण्यात आले .पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा मयताची पत्नी वैशाली इंगळे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन बाळासाहेब शिंदे, रोहित बाळासाहेब शिंदे ,बाळासाहेब भारत शिंदे ,गणेश भारत शिंदे व एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .खुनातील मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी ही फिर्यादीच्या नातेवाईकाने केली आहे.

IPL 2025 MI vs KKR : मुंबईचा घरच्या मैदानात पहिला सामना, वानखेडेत केकेआरचं आव्हान

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणेकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. मुंबईने या हंगामातील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. तसेच कोलकाताची पराभवाने सुरुवात झाल्यानंतर त्यांनी दुसर्‍या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे केकेआरचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना केव्हा?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना सोमवारी 31 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.

“गुढीपाडव्यावर विजय वडेट्टीवार यांचा सवाल: ‘मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का?'”

Vijay Wadettiwar चंद्रपूर : मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, आम्ही या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं त्याला पडू दे, मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही, असं म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहते. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी बोलताना काल(30 मार्च संध्याकाळी माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

एकीकडे शुभेच्छा, दुसरीकडे गुढीपाडव्याबाबत प्रश्नचिन्ह?

दरम्यान, एकीकडे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे केलं असताना त्याच वडेट्टीवार यांनी  गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांनी नवं गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. त्यात ते म्हणाले कि, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. असे म्हणत त्यांनी एक्स या माध्यमावार पोस्ट केली आहे. त्यामुळे एकीकडे प्रश्नचिन्ह उभे करणारे काँग्रेसचे गटनेते वडेट्टीवार त्याच सणाला ते शुभेच्छा देत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..

नागपूर हिंसाचार प्रकरणात आणखी अटक; पोलिसांचे अटकसत्र सुरू, सोशल मीडियावर ‘हेट स्पीच’वर विशेष नजर

Nagpur Violance Update : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील (Nagpur Violance) कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

फैजान खातीबवर जमावाला भडकावल्याचा आरोप

नागपूर हिंसाचार प्रकरणात फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणाच्या तपासात रोज नवी माहितीप  पुढे येत असताना  नागपूर पोलिसांनी या प्रकरणात तिसरी मोठी अटक केली आहे. फैजान खातीब सह आणखी एक आरोपी शहबाझ काझी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अद्याप नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे. फैजान खातीब हा अकोल्यामध्ये असतो. मात्र ईद निमित्त महिनाभरापूर्वी तो त्याच्या मूळगावी म्हणजेच नागपुरात आला होता. 17 मार्चला नागपूरला झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून खातीबला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!

नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहिम खान आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर नंतर फैजान खातीब ही या प्रकरणातील तिसरी मोठी अटक मानल्या जात आहे. यापूर्वी नागपूर पोलिसांनी (Nagpur City Police) सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फूटप्रिंटसच्या आधारे नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 113 वर पोहोचली होती. आता त्यात आणखी आरोपींची भर पडली आहे.

पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, ‘हेट स्पीच’वरही नजर

नागपुरात नुकतच उसळलेला हिंसाचार आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरात होत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा हे पाहता, पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवणे सुरू केले आहे… कोणत्याही प्रकारच्या “हेट स्पीच”वर नजर ठेवण्यासाठी नागपूर सायबर सेल ने विशेष टीम तयार केली असून पंतप्रधान यांच्या दौऱ्या दरम्यान सोशल मीडिया वर अफवाह पसरविणारे, हेट स्पीच संदर्भात व्हिडिओ पोस्ट करणारे किंवा त्यांना फॉरवर्ड करणाऱ्यावर कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशाराच सायबर सेल ने दिला आहे.. त्यामुळे कायद्याच्या अजाणतेमुळे सोशल मिडिया वर काही ही पोस्ट करण्यापूर्वी विचार करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

अकोल्यात सायकल दुकानातून 1.15 कोटींची रोकड जप्त; आयुध निर्माणी स्फोटप्रकरणी आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा

Akola News : अकोल्यात एका सायकलच्या दुकानातून तब्बल 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीचे दुकानात खदान पोलिसांनी ही कारवाई केलीय. यावेळी त्यांनी 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केलीय. संबंधिताला या रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी नागपूर येथील आयकर विभागाला याबाबत माहिती दिलीये. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ही कारवाई करण्यात आलीय. दीपक घुगे नामक व्यक्तीजवळ पांढर्‍या रंगाच्या दोन कापडी पिशव्या होत्या. त्यामध्ये 500 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल होतेय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करतायेत.

आयुध निर्माणीच्या आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या LTPE सेक्शनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. नव्यानं गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे (५९) यांच्यासह महाप्रबंधक अनुज प्रसाद (५९), महाप्रबंधक ललित कुमार (४९) यांचा समावेश आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर दाखल आहेत गुन्हे. या तिघांच्या समावेशाने आता आयुध निर्मणी स्फोट प्रकरणात हलगर्जीपणा केल्यानं आतापर्यंत सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणात चौकशीअंती आयुध निर्माणीचे एकूण सात अधिकारी दोषी आढळून आले असून पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या लेखी रिपोर्टवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी करीत आहेत.

यापूर्वी यांच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा

१) देवेंद्र रामदास मिना (४९) (सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी)
२) आदिल रशील फारुकी (४६) (ज्युनीअर वर्क मॅनेजर, मेन्टनन्स विभाग)
३) संजय सुरेश धपाडे (४४) (सामान्य प्रशासन विभाग)
४) आनंदराव मधुकरराव फाये (५०) (सेक्शन प्रभारी अधिकारी) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

म्यानमार, थायलंड आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के; शेकडो मृत्यू, मोठ्या वित्तहानीची भीती

भकंपामुळे अनेकांचा मृत्यू,अफगाणिस्तानही जामवले भूकंपाचे धक्केImage Credit source: social media

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता अफगाणिस्तानमध्येही शनिवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 5 वाजून 16 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे धक्के बसले, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.7 इतकी मोजली गेली. मात्र या भूकंपामुळे अद्याप कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झालेली नाही. शुक्रवारी म्यानार, थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे आत्तापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्याही प्रचंड आहे. यामुळे अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणाक खाली कोसळल्या, बौद्ध स्तूप, रस्ते आणि पूलही काही क्षणांतच उद्ध्वस्त झाले.

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी मोजवी गेलवी, मात्र कालच्या भूकंपाननंकतर आजही अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, म्यानमारमध्ये शुक्रवारी रात्री 11:56 वाजता (स्थानिक वेळेनुसार) दुसरा भूकंप झाला, त्याच तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेली. NCS च्या मते, हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर जाणवला, ज्यामुळे आफ्टरशॉकची शक्यता आहे.

महत्नाचे अपडेट्स

हे सुद्धा वाचा

– म्यानमार आणि शेजारच्या थायलंडमध्ये अनुक्रमे 7.7 आणि 7.2 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे इमारती, पूल आणि बौद्ध मठ नष्ट झाले. म्यानमारमध्ये 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी आहेत. सर्वात जास्त नुकसान झालेल्या दोन शहरांमधील फोटो आणि व्हिडिओ हे धडकी भरवणारे दिसत आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे निर्माणाधीन एक उंच इमारत कोसळून किमान 10 जणांचा मृत्यू झाला.

– म्यानमारमध्ये,भूकंपामुळे झालेले मृत्यू, जखम आणि नुकसानीचा अद्याप पूर्ण अंदाज लावण्यात आलेला नाही. सध्या देश गृहयुद्धात अडकला आहे आणि लष्करी राजवटीमुळे माहितीवर कडक नियंत्रण ठेवण्यात आहे.”मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, अशी माहिती म्यानमारच्या लष्करी सरकारचे प्रमुख, वरिष्ठ जनरल मिन आंग हलाईंग यांनी दिली. आत्तापर्यंत 150 च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला असून 730 जण जखमी झाल्याचे समजते.

– थायलंडची राजधानी बँकॉकमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका उंच इमारतीसह तीन बांधकाम साइट कोसळल्याने 10 लोक ठार, 16 जखमी आणि 101 बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी दुपारी7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडालेजवळ होता. या भूकंपानंतर, आणखी आफ्टरशॉक देखील बसले, त्यापैकी एकाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजली गेली. मंडालेमध्ये, भूकंपामुळे शहरातील सर्वात मोठ्या मठांपैकी एकासह अनेक इमारती कोसळल्याचा अहवाल आहे.

– म्यानमारची राजधानी नेपीडॉ येथील विनाशाचे अनेक पोटो समोर आले असून, त्यामध्ये बचाव पथकाचे अधिकारी नागरी सेवकांच्या निवासस्थानाच्या अनेक इमारतींच्या ढिगाऱ्यातून पीडितांना बाहेर काढताना दिसले. सर्वाधिक प्रभावित भागात रक्ताची नितांत गरज असल्याचे म्यानमार सरकारने सांगितले.

भारतातर्फे मदतीचा हात

– विनाशकारी भूकंपाचा फटका बसलेल्या म्यानमारसाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. 15 टन मदत सामग्री मदत म्हणून पाठवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे C-130J सुपर हर्क्युलस विमान हिंडन एअरफोर्स स्टेशनवरून मदत साहित्य घेऊन म्यानमारला रवाना झाले. त्यामध्ये ज्यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्स, ब्लॅंकेट्स, खाण्यासाठी तयार अन्न, वॉटर प्युरिफायर, सॅनिटेशन किट, सौर दिवा, जनरेटर सेट, आवश्यक औषधे (पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युलस, सिरिंज, हातमोजे, कॉटन स्वॉब, इ.) यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राने म्यानमारला मदत आणि बचाव कार्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स दिले आहेत.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेचा अंदाज 

– भूकंपामुळे तुटलेले रस्ते, कोसळलेले पूल आणि तुटलेले बंधारे यांच्या बातम्या समोर येत आहेत, आधीच मानवतावादी संकटाशी झुंजत असलेल्या देशातील दुर्गम भागात बचाव पथके कसे पोहोचतील याची चिंता सर्वंना सतावत आहे. ‘या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाचे मूल्यांकन करण्यासाठी आम्हाला काही आठवडे लागू शकतात, अशी शंका म्यानमारचे डायरेक्टर जनरल मोहम्मद रियास यांनी व्यक्त केली. या भूकंपामधील मृतांचा आकडा 1000 पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने व्यक्त केला आहे.

– थायलंडपेक्षा म्यानमारमध्ये भूकंप तुलनेने अधिक सामान्य आहेत. 1930 ते 1956 दरम्यान, देशाच्या मध्यभागी जाणाऱ्या सागिंग फॉल्टच्या बाजूने 7.0 तीव्रतेचे सहा शक्तिशाली भूकंप झाले, अशी बातमी AFP ने USGS चा हवाला देऊन वृत्त दिले. थायलंड भूकंपाच्या क्षेत्रात येत नाही आणि तिथे जाणवलेले सर्व भूकंप हे शेजारच्या देशातून, म्यानमारमधून येतात. बँकॉकमधील इमारती शक्तिशाली भूकंपांना तोंड देण्यासाठी तयार नसल्यामुळे, येथील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

– संयुक्त राष्ट्र म्यानमारसाठी मदत सामग्री गोळा करत आहे. ते म्हणाले की, म्यानमार सरकारने आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे, असे संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी शुक्रवारी सांगितले.बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्षेत्रातील संसाधने एकत्रित करण्यासाठी देशात संयुक्त राष्ट्राची टीम संपर्कात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्यानमारला मदत करण्याचे आश्वासन दिले.