back to top
Sunday, September 14, 2025
9.2 C
London
Home Blog Page 9

शिवाजी महाराजांविषयी संभाजी भिडे यांचे वक्तव्य; अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया

 

‘शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे’, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होतं. पुढे त्यांनी असेही म्हटले होते की, शिवाजी महाराजांसारख्या अलौकिक व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग करत आहेत. त्यांचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले प्राध्यापक, व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री आहेत. स्वतः शहाजीराजे यांनीही हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचे राष्ट्र करायचे आहे. तर शिवाजी महाराजांचा उपयोग हे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल, हे बघतोय त्यामुळे सगळा चौथा झाला असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत त्यांना खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात, धर्म पाहिला नाही.’, असं अजित पवार म्हणाले.

नरेंद्र मोदींचा गुढीपाडव्याला नागपूर दौरा: रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला भेट, विरोधकांची टीका

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नागपुरात संघाच्या रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत, अशी माहिती आहे. प्रशासनाकडून कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुढीपाडव्याला नागपूरात आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (उद्या 30 मार्च) गुढीपाडव्याला नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देणार असून त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  रेशिमबाग स्मृती मंदिर परिसरात  जाणार आहे.  दरम्यान, देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहे. 

दरम्यान, याच मुद्द्याला घेऊन विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पंत प्रधानांच्या या नागपूर दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी कधीच आले नाही, आता येत आहे. त्यांच्या विजयात नरेंद्र मोदींचा करिष्मा नाही तर संघाचा करिष्मा आहे, असं पटलं असेल म्हणून ते येत आहे. असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

पंतप्रधानांचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्थाकडे जातोय- विजय वडेट्टीवार

संघाचे शंभर वर्ष दोन समाजात दरी निर्माण करणारा असा इतिहास राहिला आहे. पूर्वी स्वातंत्र्य काळापूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते. संघाची भुमिका परिस्थितीनुसार बदलली आहे. संघाचा अजेंडा विभाजनाचा आहे. तर काँग्रेसची भूमिका सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. मात्र संघाची विचारधारा विशिष्ट विचाराला घेऊन चालणारी आहे. त्यामुळे शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने संघाची पुढची भूमिका बदलेल, अशी अपेक्षा ठेवूया. असेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. पंतप्रधान मोदी 12 वर्षानंतर संघ मुख्यालयामध्ये येत आहे. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्थाकडे जातोय, असे म्हणावे लागेल. अशी टीका ही वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराजाचा अपमान करणाऱ्यांची यादी काढा, किती आणि कोणावर कारवाई झाली?

उदयनराजें कधी कधी खर बोलतात. त्यांच्या मनात राग आला की ते खरं बोलतात. कोश्यारी पासून महाराजाचा अपमान करण्याची यादी काढली तर किती आणि कोणावर कारवाई झाली? महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे, असं चित्र आहे. शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. यावर काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलंय.

सायेशा शिंदे : लिंगबदलाचा प्रवास आणि फॅशन इंडस्ट्रीतील यशस्वी वाटचाल

0

लोकप्रिय फॅशन डिझायनर जो पूर्वी स्वप्नील शिंदे या नावाने ओळखला जात होता. 40 वर्षे या नावाने स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, एके दिवशी त्याने अचानक स्वतःची ओळख बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो चर्चेत आला. ट्रान्सवुमन बनल्यानंतर तिने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केलं. पण स्वप्नीलचा हा प्रवास फार वेदनादायी होता. सध्या ज्या फॅशन डिझायनरची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून सायेशा शिंदे आहे. तिला पूर्वी स्वप्निल शिंदे या नावाने ओळखलं जायचं.

अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘लॉकअप स्टार’ या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसला होता. तो पुरुष म्हणून जन्माला आला पण त्याच्या आत एक स्त्री जन्म घेत होती आणि नंतर त्याने लिंग बदल निर्णय घेतला. आज सायेशा हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे आणि तिचा दर्जा परदेशी प्लॅटफॉर्म मिस युनिव्हर्समध्येही पाहायला मिळाला आहे.

एका मुलाखतीत प्रसिद्ध ट्रांसजेंडर फॅशन डिझायनर सायेशा शिंदे हिने आराध्या – ऐश्वर्या यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सायेशा म्हणाली, ‘माझ्या लिंग बदलाची बातमी कधीही न्यूजपेपरमध्ये आली नाही. काही ठराविक लोकांनाच माझ्या लिंग बदलाबद्दल माहिती होतं. माझं सत्य इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोकांना माहिती होतं. त्यामुळे फिटिंगसाठी जात असताना मी ऐश्वर्या हिच्या मॅनेजरला सांगितलं होतं, स्वप्नील हा नाही येणार नाही तर, सायेशा येणार आहे. ही गोष्ट मी ऐश्वर्या हिच्या मॅनेजरला सांगितली होती. कारण समोर आल्यानंतर कोणाल धक्का बसायला नको…’

हे सुद्धा वाचा

पुढे सायेशा म्हणाली, ‘ऐश्वर्या हिने मला आदर आणि सन्मान दिला. पूर्ण वेळ ऐश्वर्या मला फक्त सायेशा नावाने हाक मारत होती. एवढंच नाही तर, मुलगी आराध्या त्याठिकाणी आल्यानंतर ऐश्वर्या हिने आराध्यासोबत माझी ओळख सायेशा म्हणून करुन दिली…’ ऐश्वर्या हिने ज्याप्रमाणे स्वप्निल पासून सायेशा झालेल्या फॅशन डिझायनरला प्रेम दिलं, ते पाहून सायेशा प्रचंड भावुक झाली.

वेदनादायी होता लिंगबदलाचा प्रवास

मुलगा असताना मुलगी होणं सायेशासाठी फार कठीण होतं. वयाच्या 40 व्या वर्षी सायेशा हिने लिंग बदलाचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सायेशाने लिंग बदलाची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनीही तिचा निर्णय मान्य केलं. प्रदीर्घ शस्त्रक्रियेनंतर सायशाला नवीन आयुष्य मिळालं. नुकताच, सायेशा हिने योनी प्रत्यारोपण बद्दल माहिती दिली. या दरम्यान सायेशा हिने असह्य वेदना सहन केल्या.

कोण आहे सायेशा शिंदे?

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सायेशा शिंदे हिले अनेक जण स्वप्निल शिंदे म्हणून ओळखतात. सायेशा एक ट्रांसजेंडर महिला आहे. सायेशा हिने सामाजाची पर्वा न करता फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि सायेशा शिंदे म्हणून स्वतःची ओळख निर्माणे केली. वयाच्या 40 व्या सायेशा हिने स्वतःचा स्वीकार ट्रांसजेंडर महिला म्हणून केला.

pm modi in nagpur : पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा: दीक्षाभूमी व हेडगेवार स्मृतिस्थळी दर्शन, स्वागत योजनेत बदल

Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला असून या दौऱ्यात ते ऐतिहासिक दीक्षाभूमीसह रेशीमबागच्या स्मृतिमंदिर येथील डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) दर्शन घेणार आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान स्मृती स्थळाच्या दर्शन घेणार आहे. तर संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च गुडीपाडवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नागपूरच्या  दौऱ्यावर आहेत. यावेळी ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’च्या विस्तारीकरणासाठीच्या इमारतीच्या पायाभरणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. 

अशातच, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव 47 चौकांवर त्यांच्या स्वागताची भाजपची योजना आता बदलणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी पंतप्रधानांचा ताफा जाईल त्यापैकी अनेक रस्ते निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविल्याने भाजपच्या स्वागताच्या नियोजनात बदल होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी भाजपच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप जोशी?

पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे जोरदार सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. सुमारे 5000 पोलीस ठीकठिकाणी बंदोबस्तात तैनात राहणार आहे. पंतप्रधान यांचा ताफा ज्या चौकामधून जाणार आहे, त्यापैकी काही चौक पोलिसांनी निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भाजपने 47 चौकांवर स्वागताची तयारीचे नियोजन केले होते, मात्र आता त्यात बदल करावे लागणार आहे. कारण पोलिसांनी काही चौक निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे किती आणि कोणत्या चौकांमध्ये स्वागत करावं, हे पोलिसांच्या निर्णयानंतर ठरेल. ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वागत होईल, त्या त्या ठिकाणी भगव्या आणि हिरव्या रंगाची म्हणजेच भाजपच्या झेंड्याची थीम स्वागतासाठी वापरली जाणार आहे. गुढीपाडवा असूनही जवळपास 15,000 भाजप कार्यकर्ते ठीकठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहतील. अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीची पायाभरणी

“माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर”च्या विस्तारीकरणासाठीच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहे. नागपूर – हिंगणा रोडवरील “माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर” च्या परिसरात पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी 5.83 एकर क्षेत्रात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं तब्बल पाच लाख वर्ग फुट बांधकाम असलेली नवीन इमारत उभारली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक संतही उपस्थित राहणार आहे.

-संघ प्रणित माधव नेत्रपेढी 1985 पासून कार्यरत आहे.
-पहिलं रुग्णालय “माधव नेत्रालय सिटी सेंटर”ची सुरुवात हिंदुस्तान कॉलनी मध्ये 2018 मध्ये झाली.
-तर वासुदेव नगर परिसरात “माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर” ची सुरुवात 2022 मध्ये झाली.
-नेत्र रुग्णांसाठी अत्यल्प दरामध्ये अत्याधुनिक नेत्ररोग चिकित्सा दोन्ही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाते.
-आता “माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर”चा विस्तारीकरण करून मध्य भारतातील सर्वात मोठं आणि आधुनिक नेत्र रोग चिकित्सालय उभारण्याचे नियोजन आहे.
-त्यासाठीच्या नव्या वास्तूच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी सरसंघचालक यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे…

Navneet Rana : औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वादंग: नवनीत राणांचा अबू आझमींवर तीव्र प्रहार!

 

मुंबई: औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान याच प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला, अशा औरंगजेबची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय.

अबू आझमी यांनी सांगितले की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, तर त्यांना मी लक्षात आणून देते की त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहावा. किंबहुना सरकारला मी आवाहन करते की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर नाव दिलं आहे. जे औरंगजेबला या राज्यात राहून आपला बाप म्हणून राहतात. अश्या लोकांना उत्तर देण्याच काम राज्य सरकारने केलं पाहिजे. असेही नवनीत राणा म्हणाल्या. हिंदुत्व विचारधारेचे सरकार आमचे आहे, असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्षमा नाही असेही त्या म्हणाल्या.

अबू आझमींवर मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यावरुन मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी या विषयी तक्रार दाखल करत मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अबू आझमी विरोधात आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पत्र दिलं असून त्याच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमची आहे. हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून हे विधिमंडळ परिसरात घडले असल्याकारणाने या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समजून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल आहे. हे वक्तव्य समोर येताच एकनाथ शिंदे यांनी देखील हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी देखील आमची मागणी आहे.

खरी शिवसेना जी आक्रमकता दाखवते ती इतर कोणीही दाखवणार नाही- किरण पावसकर

जे बाळासाहेबांचे विचार आहेत त्या विचाराला अनुसरून ज्या पद्धतीने ज्या औरंग्याचे गुणगान अबू आजमी यांनी गायलेले आहेत, त्यांना फक्त पुस्तक भेट देऊन चालणार आहे का? इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी औरंगजेबाचा गुणगान या ठिकाणी गायले जात आहे, आणि हे गुणगान गात असताना खरी शिवसेना म्हणून आम्ही ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवलेली आहे ती आक्रमकता इतर कोणीही दाखवणार नाही. हे फक्त बोलून घरीच बसणार असल्याचा टोला हा किरण पावसकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

अधिक पाहा..

वर्ध्यात ट्रक अनियंत्रित होऊन घरात शिरला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, तिघे जखमी.! वाचा सविस्तर बातम्या

मुंबई : राज्यातील अपघाताच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. दररोजच अपघाताच्या घटनांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. आजही परभणी, शिर्डी आणि वर्ध्यात तीन ठिकाणी वेगवेगळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 1 ठार आणि 6 जण जखमी झाले असून परभणीतील अपघात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची माहिती आहे. परभणी (Parbhani) गंगाखेड महामार्गावरील महेश जिनिंग मिल समोर उसाचे बेणे घेऊन जाणाऱ्या ट्रकने 3 दुचाकींना उडवल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार व तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे वर्ध्यात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घरातच शिरला. सुदैवाने येथे कुणीही जखमी झालं नाही, पण ट्रकने पेट घेतल्याने ट्रक जळून खाक झाला आहे.

परभणतील सुस्साट सुटलेल्या ट्रक अपघताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत केले आणि वाहतूक पूर्ववत केली. मात्र, अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर तिघे जखमी झाल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला. दरम्यान, अपघातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ट्रकला लागलेली आगही विझवण्यात आली आहे. सध्या ट्रकचालक  फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

वर्ध्यात ट्रक अनियंत्रित होऊन घरात शिरला

वर्ध्यातील सिंदी मेघे परिसरात असलेल्या नागठाणा शिवारात महामार्गावर धावणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला. ट्रक रस्त्याच्या कडेला बाहेर जात बाजूच्या घरातच शिराल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव असलेल्या या ट्रकने अचानक पेट घेतला असून ट्रकला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. किराणा माल भरून असलेला हा ट्रक मोठ्या प्रमाणात जळाल्याने ट्रकचे अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रकमधील चालक व क्लिनर बचावला आहे. नागपूरवरुन कर्नाटक येथील हुबळी येथे हा ट्रक माल घेऊन निघाला होता, तेव्हा नागपूर-तुळजापूर मार्गावर ही भीषण घटना घडली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, तिघे जखमी

शिर्डीजवळील समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. कोपरगाव शिवारातील शिर्डी टोल नाक्याजवळ अपघातात चार चाकी वाहनाचे मोठं नुकसान झालं आहे.  अवजड वाहनाला मागून धडक दिल्याने चारचाकी कारचं मोठ नुकसान झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातात कारमधील मयंक लोहिया, त्यांची पत्नी आणि आठ महिन्यांची चिमुकली जखमी झाली आहे. अपघातानंतर तत्काळ जखमींना उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, कारला धडक देणारे अवजड वाहन मात्र घटनास्थळावरून फरार झालं आहे.

हेही वाचा

धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल

अधिक पाहा..

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात (Lake) बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी तलावात दुपारच्या दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच, तलाव पात्रात बुडालेल्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, कालच होळीच्या सेलिब्रेशनंतर बदलापूर येथील उल्हास नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता घोडझरी येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली आहे.

तलाव पात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे असून हे पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाची यंत्रणाही कार्यरत झाली असून घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Wardha : मंत्रतंत्राद्वारे गुडघेदुखी बरी करण्याचा दावा करून भोंदू बाबाने ५० हजार रुपयांची फसवणूक

Wardha Crime : कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय, आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतो, असा दावा वर्ध्यात भोंदूबाबाकडून केला जायचा. हा दावा करणाऱ्या भोंदूबाबाने वर्ध्यातील (Wardha Crime News) एका व्यक्तीची तब्बल 50 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नळीच्या साहाय्याने शरीरातील अशुद्ध रक्त तोंडाने ओढण्याचा ढोंगी प्रयोग करत ही फसवणूक केली गेली आहे. वर्धा पोलिसांनी (Wardha Police) याप्रकरणी तिघांना अटक केली. तर नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ध्याच्या सुदामपुरी येथील 65 वर्षीय प्रकाश शिंदे नामक व्यक्तीला दोन वर्षांपासून उजव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास असल्याने सेवाग्राम, नागपूर, यवतमाळ येथे त्यांनी उपचार केले. पण, आराम मिळाला नाही. दरम्यान घराजवळ आलेल्या अनोळखी इसमाने तुमच्या पायाची गुडघेदुखी आपल्याला तपस्या करून मिळालेल्या अतेंद्रीय शक्तीने बरे करुन देतो, असा दावा केला. उपचार करण्यास नकार दिल्यावर देखील तो इसम घरात आला आणि उपचार सुरू केला. पाणी, मंत्राचा कागद, प्लास्टिक नळी यातून त्याने उपचार सुरू केले. ढोंग करीत रबरी नळीने शरीरातून काढलेल्या अशुद्ध रक्ताच्या प्रत्येक घोटाचा खर्च अडीच हजार रुपये असल्याचे सांगून सत्तावीस घोट काढण्यात आले. उपचारानंतर तब्बल पन्नास हजार रुपये सदर व्यक्तीकडून उकळण्यात आले. पण उपचारानंतर शिंदे यांना आपण फसलो असल्याचे लक्षात आले.

‘असे’ फुटले भोंदू टोळीचे बिंग 

यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा तशाच प्रकारचा व्यक्ती त्यांच्या घराजवळ आला. त्याने त्याच पद्धतीने प्रयोग करीत उपचार करण्याचा दावा केला. त्याच्या सोबत काही महिला देखील होत्या. यापूर्वीच फसवणूक झालेल्या प्रकाश शिंदे यांनी त्याला घरात घेत उपचाराची तयारी दाखवली आणि लागलीच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. फोनवर नातेवाईकही एकत्र झाले. पोलीस आणि जमलेल्या नातेवाईकांपुढे या अंतेद्रीय शक्ती असणाऱ्या भोंदू टोळीचे बिंग फुटले. पूर्वी पन्नास हजार रुपये घेऊन पसार झालेल्या भोंदूला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विदेशी चलनाच्या काही नोटा, बनावट औषधी, वेगवेगळ्या तारखांचे आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीनन अब्दुल हाफिस दोघेही (रा. बुंदी राजस्थान), सायरा बानो शरीफ (रा. बुंदी राजस्थान) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच इतर अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yavatmal : आरोपीला अटक केल्यानंतर त्याला लॉकअप करीत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार

Yavatmal News: यवतमाळच्या पांढरकवडा येथे एका गुन्ह्यात आरोपीला (Crime News)  अटक केल्यानंतर त्याला लॉकअप करीत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. पांढरकवडा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली आहे. प्रवीण रमेश लेनगुरे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी याला ताब्यात घेतले होते, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्याचे मेडिकल करण्यात आले. शिवाय त्याला ठाण्यात आणून रितसर अटकेचीची प्रक्रिया ही पार पाडल्या गेली. त्यानंतर त्याला लॉकअप करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले असता तो मोठ्या सिताफीने पसार झाला आहे. मात्र या घटणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

दोन हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक,हवालदाराला रंगेहात अटक

यवतमाळच्या दिग्रस पोलीस ठाण्यात अदखलपात्र असलेल्या गुन्ह्यात मदत आणि कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षक तसेच हवालदाराला अँटी करप्शन विभागाने रंगेहात अटक केलीय. पोलिस उपनिरीक्षक नारायण धोंडबा लोंढे (54), हवालदार दिलीप प्रल्हाद राठोड (41) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कार्यवाही न करण्याकरिता पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडीनंतर दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज सापळा रचत त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिग्रस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

दोन धरण असूनही दिग्रसवासीयांना पाणी टंचाईचे चटके

दिग्रस नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभारामुळे दिग्रस शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईच्या प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी दिग्रस नगर परिषदेवर नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी घागर मोर्चा काढून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिग्रस शहरा लागत दोन धरणे असून अरुणावती धरणांतुन दिग्रस शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि नांदगव्हाण धरणांच्या दुरुस्तीसाठी नगर परिषद दिरास मार्फत कोट्यावधी रुपये खर्च केले. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला अशी स्थिती दिग्रस शहरातील नागरिकांची झाली आहे.

Chandrapur Bus Accident : 11 ते 12 प्रवासी जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात नादुरुस्त ट्रकला बसने जोरदार धडक (Chandrapur Bus Accident) दिली असून या भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींपैकी 3 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर ही घटना (Accident)घडली असून या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

11 ते 12 प्रवासी जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक

पुढे आलेल्या माहितीनुसार, ही बस नागपूरवरून चंद्रपूरकडे येत होती. दरम्यान, रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास  हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप वनकर असं मृत कंडक्टरचं नाव असून ते चंद्रपूर शहरातील नगीना भाग परिसरातील निवासी आहे. यातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पडोली पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. ड्रायव्हरने कुठलेही सुरक्षा नियम न पाळता नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.