back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

Chandrapur Bus Accident : 11 ते 12 प्रवासी जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात नादुरुस्त ट्रकला बसने जोरदार धडक (Chandrapur Bus Accident) दिली असून या भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींपैकी 3 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर ही घटना (Accident)घडली असून या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

11 ते 12 प्रवासी जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक

पुढे आलेल्या माहितीनुसार, ही बस नागपूरवरून चंद्रपूरकडे येत होती. दरम्यान, रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास  हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप वनकर असं मृत कंडक्टरचं नाव असून ते चंद्रपूर शहरातील नगीना भाग परिसरातील निवासी आहे. यातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पडोली पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. ड्रायव्हरने कुठलेही सुरक्षा नियम न पाळता नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Popular Categories

spot_imgspot_img