back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

Dharavi Gas Cylinder Detonation | धारावीत गॅस सिलेंडरच्या ट्रकला भीषण आग: 12 ते 13 सिलिंडरचे एकामागे एक स्फोट; अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

धारावीमध्ये बस डेपोजवळ गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 12 ते 13 सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री दहा वाजण

अनेक दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. यानंतर गाडीत असलेल्या 12 ते 13 सिलेंडरचे एकामागे एक स्फोट झाले. मोठी वर्दळ असलेल्या बस डेपोजवळ ही घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला होता. या घटनेत ट्रकच्या आसपास असणाऱ्या 5 ते 10 दुचाकी जळून खाक झाल्या. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अग्निशामक दलाच्या 8 ते 10 गाड्या आणि पाण्याचे 10 टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. यादरम्यान, पोलिसांकडूनही सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली गेली. सिलिंडर ब्लास्टनंतर ट्रकला आग लागल्याने हवेत धुराचे लोटही पसरले होते. तर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले – बाबुराव माने

दरम्यान, धारावी नेचर पार्कजवळ सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग लागली. आतापर्यंत 13 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. आजूबाजूच्या घरांमधील लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच आग आटोक्यात येईल, असे स्थानिक आमदार बाबुराव माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

याबाबत माहिती देताना डीसीपी गावडे यांनी सांगितले की, धारावी पोलिस ठाणे हद्दीत निसर्ग उद्याण गार्डनच्या बाजुला पावणे दहा वाजेच्या सुमारास एका गॅस सिलिंडर असलेल्या वाहनाला आग लागल्याची माहिती आली होती. त्यामध्ये काही गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, यामुळे आग वाढली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यासह आसपासच्या पोलिस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी लोकांना घटनास्थळापासून दूर केले. सध्या आग विझविण्यात आली आहे. या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. आता वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे, अशी माहिती डीसीपी गावडे यांनी दिली

Popular Categories

spot_imgspot_img