आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणेकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. मुंबईने या हंगामातील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. तसेच कोलकाताची पराभवाने सुरुवात झाल्यानंतर त्यांनी दुसर्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे केकेआरचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना केव्हा?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना सोमवारी 31 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.