back to top
Friday, November 14, 2025
13.1 C
London

Kolhapur l पसरणी घाटात कार 200 फूट खोल दरीत कोसळली: पुण्यातील दोन पर्यटक ठार, दोघे गंभीर

कोकणात फिरण्यासाठी गेलेले पर्यटक महाबळेश्वर, पांचगणी , वाईमार्गे परत पुण्याला जात असताना पसरणी घाटातून त्यांची कार 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघे ठार तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरचे रहिवा

पुण्यातील लोणी काळभोरचे रहिवासी असलेले बजरंग पर्वत काळभोर, वैभव काळभोर , सौरभ जालिंदर काळभोर आणि अक्षय मस्कू काळभोर हे दोन दिवसांपूर्वी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वर, पांचगणी , वाईमार्गे पुण्याला जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ( एमएच 12 क्यूटी 7711) पसरणी घाटातून 200 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. त्यातील सौरभ जालिंदर काळभोर आणि अक्षय मस्कू काळभोर या दोघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमींवर बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोकण दर्शनानंतर परत जाताना पुण्याच्या पर्यटकांवर ऐन होळी सणादिवशीच काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते आणि वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना दरीतून दोरखंडाच्या साह्याने वर आणले. यावेळी पसरणी घाटात बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळं घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसरणी हा घाट तीव्र उताराचा आहे. त्यामुळे पांचगणी हून वाईला येताना या घाटात वाहनांचे भीषण अपघात होतात. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था तसेच कमी उंचीचे कठडे असल्यानं वाहने दरीत कोसळतात. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी संरक्षण कठड्यांची उंची वाढविणे गरजेचे बनले आहे.

.

Popular Categories

spot_imgspot_img