back to top
Saturday, September 13, 2025
11.7 C
London

Kunal Kamra Video : कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील ‘या’च गाण्यामुळं पेटला वाद

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या शिंदे यांच्यावरील गाण्यामुळे वाद उपस्थित झाला आहे. शोमधील ‘गद्दार नजर आए’ या कुणालच्या गाण्यामुळे वाद निर्माण झाला. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिकांकडून द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे. कुणाल कामराला काळा फासण्याचा शिवसेना नेत्यांनी आता इशारा दिला आहे. तर कुणाल का कमाल, कामरावर राऊतांनी ट्विट करत शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलं होतं. कुणाल कामराचा एक गाणे त्याची स्टँडअप कॉमेडीचा तो व्हिडिओ शेअर केला होता संजय राऊत यांनी. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. ज्या ठिकाणी या गाण्याचं सगळं शूटिंग झालं त्या हॉटेलच्या त्या सेटची तोडफोड देखील शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे. शोमधील गद्दार नजर आहे या कुणाल कामराच्या गाण्यामुळे हा सगळा वाद उपस्थित झालाय. कुणालने शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख करत सादर केलेल्या गाण्यामुळे हा मोठा वाद झाला आहे. या प्रकरणी राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तर आमदार मुरजी पटेल यांच्याकडून अंधेरीमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरुद्ध तक्रार करण्यात आली. कुणालने माफी मागावी यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकारी नेते आक्रमक झाले.

Popular Categories

spot_imgspot_img