Nagpur: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात तापमानाचा उच्चांक होताना दिसत आहे. अकोल्यात काल 43 अंशांर्यंत तापमान गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आज नागपूर शहरातील तापमान सध्या थेट 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून, पुढील काही दिवसांत ते 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र जाणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘हिट अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेतली जात आहे, याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. (Temperature)
‘हिट अॅक्शन प्लॅन’अंतर्गत महत्त्वाच्या उपाययोजना:
-
- बेघरांसाठी शेल्टर हाऊस: शहरात बेघर नागरिकांना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी शेल्टर हाऊस उभारण्यात आले आहेत.
-
- गार्डन दुपारच्या वेळेत उघडी ठेवणार: नागरिकांना विश्रांती घेता यावी यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक बागा (गार्डन्स) दुपारीदेखील खुले ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
-
- विशेष वॉर्डसह 10 रुग्णालयांत उपाययोजना: उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपूरमधील 10 शासकीय रुग्णालयांत खास वॉर्ड उभारण्यात आले असून, यामध्ये विशेष औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
-
- हॉटस्पॉट भागांवर लक्ष: कॉटन मार्केट, गणेशपेठ, मोमिनपुरा, इतवारी, कळमना, भांडेवाडी, उत्तर नागपूर अशा उष्णतेसाठी संवेदनशील भागांमध्ये पालिकेचे पथक विशेष लक्ष ठेवणार आहे. या भागांमध्ये जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना उष्णतेपासून बचावाचे उपाय सांगितले जातील.
-
- शाळांच्या वेळांमध्ये बदल: उन्हाच्या तीव्रतेमुळे मनपा हद्दीतील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
-
- वाहतूक दिवे दुपारी बंद: शहरातील प्रमुख चौरस्त्यांवरील सिग्नल्स (वाहतूक दिवे) दुपारच्या वेळेत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
- मनपाच्या या हिट अॅक्शन प्लॅनमुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.
परभणीत गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड तापमान
परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या २ दिवसांपासुन तापमान चांगलेच वाढले आहे. काल 40 तर आज थेट 41.03 अंशांवर तापमान गेले आहे.सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.घरबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल,टोपी घालून बाहेर पडत आहेत.
हेही वाचा:

Jaykumar Gore: दीड लाख पगार घेणाऱ्या झेडपी शाळेतील टिचरचा पोरगा इंग्रजी मीडियममध्ये शिकतो, हे पेव कोणामुळे फुटलं? जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांची शाळा
अधिक पाहा..