Santosh deshmukh case hearing updates next hearing on 10th april
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात दुसरी सुनावणी पार पडली. यादरम्यान केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला आहे. तर अजून कागदपत्र मिळालेले नाहीत, त्यामुळे आरोप निश्चिती नको असं आरोपीच्या वकिलांनी म्हंटलं आहे. आजची सुनावणी पूर्ण झाली असून पुढची सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज दुसरी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते. आरोपीचे वकील आणि उज्वल निकम यांच्यात छोटासा युक्तिवाद झाला. यावेळी ही केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं उज्वल निकम यांनी म्हंटलं आहे. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आरोप निश्चितीची घाई करू नये असं म्हंटलं. अद्याप आम्हाला सगळे कागदपत्र मिळालेले नाही त्यामुळे आरोप निश्चिती आत्ताच नको असं आरोपीच्या वकिलांनी म्हंटलं.

Read More