Shirur crime accuse satish bhosale wife on hunger strike health updates
शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पत्नीचं उपोषण हे आज पाचव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेजु भोसलेकडून हे उपोषण करण्यात येत आहे.
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले हा शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी आहे. पोलिसांनी खोक्याला ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाकडून त्याच्या घरावर तोडक कारवाई केली आहे. त्यानंतर काही अज्ञात इसमांनी त्याचं घर जाळून कुटुंबाला मारहाण केल्याचं देखील सतीश भोसलेच्या कुटुंबाने म्हंटलं आहे. या संपूर्ण घटनेत दोषीवर कारवाई करण्याची मागणी सतीश भोसलेची बायको तेजु भोसलेने केली आहे. त्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेजु उपोषणाला बसली असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

satish bhosale wife on hunger strike
Also Read