back to top
Wednesday, November 5, 2025
16.7 C
London

Vaishnavi Hagawane Case : असं माझ्यामागे लचांड लागतं… अजित पवारांच्या वक्तव्यानं हशा अन् प्रश्न विचारताच दादा मिडीयावरच भडकले

वैष्णवी हागवणेच्या मृत्यूवरून अजित पवार सध्या मिडीयावरच भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीच्या एका कार्यक्रमात अजित पवारांच्या एका वक्तव्याने हशा पिकवला. त्यावरून कोल्हापूरात अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच दादांचा राग मिडीयावरच अनावर झाला. कोल्हापुरात बोलत असताना अजित पवारांनी आपला राग मिडीयावरच काढला आणि दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर मिडीयाचा धंदा काय हे ही फिक्स करून टाकलं. विषय वैष्णवी हागवणेच्या मृत्युचा होता. बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपण लग्नाला जातो आणि मग लचांड मागे लागत असं वक्तव्य करून हशा पिकवला. कार्यकर्त्या हसले अजित पवारही हसले. कोटींच्या हुंड्यासाठी वैष्णवी हागवणेची सासरच्यांकडून हत्या झाल्याचा आरोप आहे. विषय एवढा गंभीर असताना अजित पवारांनी हशा पिकवल्याने कोल्हापूरात माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावरून अजित पवारांचा भडका उडाला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Popular Categories

spot_imgspot_img