back to top
Saturday, September 13, 2025
16.3 C
London

Vaishnavi Hagawane Case : सुनांना मारझोड करणाऱ्या हगवणेंचा आणखी एक उद्योग समोर, बैलासमोर नाचवलं गौतमी पाटीलला, VIDEO व्हायरल

पुण्याच्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यात एकच संताप व्यक्त केला जात आहे. सासऱ्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेनी स्वतःचा जीव दिला असल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर केला जात आहे. या प्रकरणी तपास सुरू असताना आता हगवणे कुटुंबाचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. घरातील सुनांना जनावराप्रमाणे वागणूक देणाऱ्या हगवणे कुटुंबानं एका जनावरासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हगवणे कुटुंबाच्या एका लाडक्या बैलाचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने एक खास आयोजन करण्यात आलं होतं. या बैलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला प्रसिद्धी नृत्यांगणा गौतमी पाटील हिला चक्क त्या बैलासमोर नाचवण्याचा उद्योग हगवणे कुटुंबाने केला. याच कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याच कार्यक्रमावेळी स्टेजवर सुशील राजेंद्र हगवणे याचा फोटो आहे. सुशील हा वैष्णवीचा दीर आहे सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे.

Popular Categories

spot_imgspot_img