back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

Wardha Accident News : वर्ध्यात दुर्दैवी घटना: नवरात्री पूजेदरम्यान तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू**

Wardha Accident News : वर्ध्याच्या आर्वी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नवरात्रीच्या निमित्ताने आई वडिलांसह शेताजवळील देवीच्या मंदिरात पुजा करण्यासाठी गेलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन वर्षीय पूर्वा दंडारे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी (Wardha News) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसर एकच खळबळ उडाली असून दंडारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

पुढे आलेल्या माहितीनुसार, पूर्वा दंडारे असे मृतक मुलीचे नाव आहे. सायंकाळी ती आई वडिलांसोबत मरामाय माता मंदिरात नवरात्री निमित्त पूजेसाठी गेली होती. आई वडील पूजा करीत असताना ती बाहेर खेळत राहिली. दरम्यान जोरात वारा सुरू झाला आणि बाहेर खेळत असलेल्या मुलीच्या अंगावर झाड कोसळलं. या घटनेनंतर पूजाला तातडीने आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र उपचार करण्यापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय.

इमारतीचा सज्जा घरावर कोसळला, दोन जण किरकोळ जखमी

उल्हासनगर कॅम्प नबर 3 मधील महाराजा हॉल जवळ असलेली पार्वती या धोकादायक इमारतीचा सज्जा घरावर कोसळल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  पार्वती इमारत ही धोकादायक असून इमारतीच्या बाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या मागील बाजूला असलेला लोखंडी ग्रील सज्जा थेट उमा माने यांच्या घरावर कोसळला. या घरात असलेल्या दोन मुली जखमी झाल्या आहेत. दरम्यान घराचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी, अशी मागणी आता येथील रहिवासी करत आहेत.

ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचे 5 गुन्हे उघड, 12 लाखांच्या 5 ट्रॉली जप्त आरोपींना बेड्या 

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या 5 ट्रॉलींची चोरी करून ती कमी किमतीत विकण्याच्या बेतात असलेल्या 5 जणांना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील 12 लाख रुपये किंमतीच्या 5 ट्रॉली पोलिसांनी जप्त केल्यात. शेतकऱ्यांच्या घरासमोर किंवा शेतशिवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलींची चोरी करण्याचा प्रकार मागील काही दिवसांमध्ये भंडाऱ्यात वाढला होता. अड्याळ पोलिसांनी रात्रगस्तीवर एका संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतल्यानंतर हे ट्रॉली चोरीच बिंग फुटलं. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी विकल्प टेंभेकर, शांतनू शेंडे, अनिस बागडे, सागर वैरागडे आणि विशाल बागडे यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील 1 ट्रॅक्टर, 5 ट्रॉली, 2 दुचाकी व 4 मोबाइल असा सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात लाखनी आणि अड्याळ पोलिससांनी विविध कलमांखाली 5 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Popular Categories

spot_imgspot_img