back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

Wardha Accident News : वर्ध्यात भीषण अपघात: रानडुकरामुळे कार अनियंत्रित; पोलीस अधिकारी व संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू**

Wardha Accident News : वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झालीय. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि  त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. दुर्दैवाने यात तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे. काल (7 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

रिलायन्स मार्टमधून एक्सपायरी आईस्क्रीमची विक्री

आईस्क्रीम खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकल्या जात असल्याची धक्कादायक बाब भंडाऱ्याच्या तुमसरच्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये समोर आलीय. यात एक्सपायरी झालेली आईस्क्रीम ही दिनशॉज कंपनीची आहे. तुमसर शहरातील अभिषेक भुरे हा युवक रात्री रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम घ्यायला गेला. त्यांनी दिनशॉज कंपनीची एकावर एक फ्री असलेली संत्रा बर्फी फ्लेवरची आईस्क्रीम घेतली असता त्या आईस्क्रीम बॉक्सवर एकावर एक असे स्टिकर चिपकविलेले दिसून आलेत. वरचा स्टिकर काढला असता, खालील स्टिकरवर आईस्क्रीम उत्पादनाची मॅनीफॅक्चरिंग तारीख दिसून आली. त्यावरून ही आईस्क्रीम एक्सपायरी झाल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. उन्हाळ्याची दाहकता सुरू झाली असून अनेक जण आता आईस्क्रीम खाण्यावर जोर देतात.  मात्र, आइस्क्रीम खाणाऱ्यांनी आता सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. दरम्यान, मॉलचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय.

ऑटो डीलर व्यापारी रमन चांडक यांची हत्या

अकोट येथील चारचाकी वाहनांचे ऑटो डीलर असलेल्या व्यापारी रमन चांडक यांची हत्या करण्यात आली आहे. अकोट तालूक्यातील अकोला जहांगीरजवळ ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात चाकू भोसकून आणि दगडाने मारून ही हत्या करण्यात आली आहे. व्यवसायातील मतभेदातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणत अकोट ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे ही पुढे आले आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे.

Popular Categories

spot_imgspot_img