back to top
Wednesday, June 18, 2025
25.8 C
London

Yavatmal : यवतमाळमध्ये मतिमंद महिलेवर अमानुष अत्याचार; रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून कृत्य

Yavatmal Crime News: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच  यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मतिमंद महिलेला बळजबरीने गाडीत बसवलं, नंतर गाडीतील एका अज्ञात नराधमाकडून गाडीतच नको ते कृत्य करत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोबतच या घटनेची माहिती कुणाला सांगितलेस तर जिवानिशी ठार करील, अशी धमकीही या आरोपीकडून देण्यात आली आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र या  घटनेनं यवतमाळ शहर हादरलंय.  

‘कुणाला सांगितलस तर जिवानिशी ठार मारीन’

पुढे आलेल्या माहितीनुसार, रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबविली, पत्ता सांगितल्या नंतर मी तिकडेच चाललो असे सांगून मी तुला घरी सोडतो असे म्हणत जबरदस्तीने मतिमंद महिलेला गाडीत बसवलं. त्यानंतर वनवासी मारुती ते जगदंबा कॉलेज परिसरात मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यनगर परिसरात राहणाऱ्या महिलेला ही बाब कुणाला सांगितलीस, तर जीवे मारीन, अशी धमकी देऊन माई हॉटेलजवळ सोडून तो पसार झाला.

 ‘त्या’ पांढऱ्या रंगाच्या गाडीचा शोध सुरू

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर भयभीत अवस्थेत घरी परतल्यानंतर तरुणीने आई आणि काकूला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकुण कुटुंबियांना जबर धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून पांढऱ्या रंगाच्या गाडीचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची शोध मोहिम सुरु केली.

भंडाऱ्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू, तर शेतात काम करणारे दोन गंभीर

भंडारा जिल्ह्यात दुपारनंतर सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह आलेल्या पावसात शेतात हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तर, अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील खांबडी शेतशिवारात सायंकाळी घडली. मृतकात एका महिलेसह हार्वेस्टर चालकाचा समावेश आहे. तर, दोन्ही जखमी है शेतमजूर आणि हार्वेस्टर वरील कामगार बसून दोघांवर सध्या अड्याळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कांता जीभकाटे (५५) आणि विजय सिंग (४०) असं मृतकांचं नावं आहे. तर, संजय गाडेकर (४७) आणि महेश तेजासिंग (३०) असं गंभीर जखमी असलेल्यांची नावं आहेत. मृतक विजय सिंग आणि जखमी महेश तेजासिंग हे दोघेही उत्तर प्रदेशातील मथुरा येथील असून या भागात ते हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतातील भातपिकाची कापणी आणि मळणी करण्याचं काम मागील काही दिवसांपासून करीत होते.

Popular Categories

spot_imgspot_img