back to top
Sunday, September 14, 2025
12.7 C
London

Yavatmal : आरोपीला अटक केल्यानंतर त्याला लॉकअप करीत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार

Yavatmal News: यवतमाळच्या पांढरकवडा येथे एका गुन्ह्यात आरोपीला (Crime News)  अटक केल्यानंतर त्याला लॉकअप करीत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. पांढरकवडा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली आहे. प्रवीण रमेश लेनगुरे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी याला ताब्यात घेतले होते, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्याचे मेडिकल करण्यात आले. शिवाय त्याला ठाण्यात आणून रितसर अटकेचीची प्रक्रिया ही पार पाडल्या गेली. त्यानंतर त्याला लॉकअप करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले असता तो मोठ्या सिताफीने पसार झाला आहे. मात्र या घटणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

दोन हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक,हवालदाराला रंगेहात अटक

यवतमाळच्या दिग्रस पोलीस ठाण्यात अदखलपात्र असलेल्या गुन्ह्यात मदत आणि कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षक तसेच हवालदाराला अँटी करप्शन विभागाने रंगेहात अटक केलीय. पोलिस उपनिरीक्षक नारायण धोंडबा लोंढे (54), हवालदार दिलीप प्रल्हाद राठोड (41) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कार्यवाही न करण्याकरिता पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडीनंतर दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज सापळा रचत त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिग्रस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

दोन धरण असूनही दिग्रसवासीयांना पाणी टंचाईचे चटके

दिग्रस नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभारामुळे दिग्रस शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईच्या प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी दिग्रस नगर परिषदेवर नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी घागर मोर्चा काढून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिग्रस शहरा लागत दोन धरणे असून अरुणावती धरणांतुन दिग्रस शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि नांदगव्हाण धरणांच्या दुरुस्तीसाठी नगर परिषद दिरास मार्फत कोट्यावधी रुपये खर्च केले. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला अशी स्थिती दिग्रस शहरातील नागरिकांची झाली आहे.

Popular Categories

spot_imgspot_img