back to top
Thursday, May 1, 2025
24.1 C
London

Yavatmal : प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात गुन्हा दाखल

Yavatmal Crime News : यवतमाळच्या लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरे यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे मालगाडीखाली आत्महत्या केली होती. यावेळी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मृत प्राध्यापक संतोष गोरे यांचे मामेभाऊ शशिकांत भट यांनी बडनेरा रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

 प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात गुन्हा दाखल

यात मृत्यू पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये असलेले 34 जण मला खूप मानसिक त्रास देत आहे, हा त्रास आता माझ्या सहनशक्ती पलीकडे गेलेला आहेत. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. असे या या सुसाईड नोट मध्ये लिहलं होतं. या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेले 34 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे शाळेतच अश्लील चाळे; गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप 

गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात आणि बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतात.

या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे.

स्कॉर्पिओ जेसीबीमध्ये भीषण अपघात; एक जण ठार, तर दोघे गंभीर

वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये  अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओ लोणार तालुक्यातील पांग्राडोळे येथिल असून स्कार्पिओ लोणारच्या दिशेने  जात असताना उभ्या जेसीबीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामधील गंभीर जखमींना वाशिमच्या दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या. 

अधिक पाहा..

Popular Categories

spot_imgspot_img